तराळकी येथील धोकादायक,जीर्ण विद्युत पोल बदलला.

0
शित्तूर

जिद्दी तरुणांच्या पाठपुराव्याने आणि महावितरण च्या कार्य तत्परतेने भविष्यात होणारी जीवितहानी टळली

शित्तूर-वारुण (शिवाजी नांगरे) शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर – वारुण येथील तरुणांच्या पाठपुराव्यामुळे आणि महावितरण च्या कार्यतत्परतेने तराळकी या शेतातील मुख्य विद्युत वाहक तारा जात असलेला, धोकादायक, जीर्ण झालेला विद्युत पोल बदलल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

                शित्तूर – वारुण येथील क्रांतीनगर मधील तरुण अविनाश यटम,आनंदा यटम आणि सतीश यटम हे  आपल्या तराळकी येथील शेताकडे काम करण्यासाठी गेले असता सदरचा विद्युत पोल अत्यन्त जीर्ण अवस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शेताकडे जाणारी पाऊलवाट या  पोळजवळूनच जात आल्यामुळे भविष्यात वारा, पाऊस, वादळा मध्ये कधीही पोल पडून एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या तरुणांनी महावितरण च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली, आणि सलग महिनाभर पाठपुरावा करून जीर्ण पोल काढून त्याठिकाणी नवीन पोल बसवून घेतला. सदरच्या कमी महावितरण चे अधिकारी प्रवीण कुंभारे,प्रशांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली वायरमन सुरेश पाटील आणि त्याच्या टीमने कॉन्ट्रक्टर मयूर पाटील यांच्या मदतीने यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल जागरूक तरुण आणि महावितरण च्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चौकट – आमच्या शेताकडे जाण्याच्या वाटेवर असणारा पोल जीर्ण झाला होता, कधीही पडून एखाद्याचा जीव गेला असता म्हणून आम्ही महावितरण शाहूवाडी च्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून देऊन पाठपुरावा केला असता त्यांनी एका महिन्यात सदर पोल बदलून त्या जागी नवीन पोल बसवून दिला त्यामुळे भविष्यातील अनर्थ टळला.

-अविनाश यटम ( ग्रामस्थ) शित्तूर – वारुण ( क्रांतीनगर )

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *