कोडणीत साडीच्या झोपाळ्याचा गळफास लागून शाळकरी मुलीचा मृत्यू

0

निपाणी,ता.08(प्रतिनिधी)

घरामध्ये साडीच्या झोपाळ्याचा गळफास लागून शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना कोडणी ता.निपाणी येथे आज बुधवार ता.8 सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. शुभ्रा युवराज राऊत-पाटील वय-14 असे मृत मुलीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुभ्रा ही श्रीपेवाडी येथील श्री जी.एम. संकपाळ हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत होती. मात्र आज बुधवारी पावसामुळे प्रशासनाने शाळेला शाळेला सुट्टी जाहीर केली होती.त्यामुळे शुभ्रा ही दोघी लहान बहीणीसोंबत घरीच होती.शुभ्रा हीची आई शेतमजुरीसाठी गेली होती.तर वडीलीसुद्धा कामानिमीत्त बाहेर गेले होते.आजी पंढरपुरला गेल्याने आजोबा घरी एकटेच होते.शुभ्रा दिवसभर शिक्षकांसोबत एसआयरचे फॉर्म भरण्यासाठी मदत करत होती. मात्र सायंकाळी 4 वाजता घरी आल्यानंतर साडीच्या झोपाळ्यावर झोके घेताना झोपाळा गोल फिरून झोपाळ्याचा फास तिच्या गळ्याला लागला. झोपाळ्यावरून तिचे पाय खाली टेकल्याने फास आणखीनच आवळला. त्यांनतर आजोबांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारील नागरीक जमा झाले.त्यानंतर उपचारासाठी निपाणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. घटनास्थळी बाल विकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.या घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यत करण्याचे काम सुरू होते.सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात मृतदेह शवविच्छेनासाठी ठेवण्यात आला होता.मयत शुभ्रा हीच्या पश्‍चात आई-वडील, दोन बहिणी, आजी, आजोबा, चुलता चुलती असा परिवार आहे.या घटनेने केोडणी परिसरात हळहळ
व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *