कोरगांवकर हायस्कूलमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
कोरगांवकर हायस्कूलमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
कोल्हापूर (प्रतिनिधी) स्वातंत्र्यसैनिक वासु देशपांडे जन्मशताब्दी अभियान अंतर्गत कोरगावकर हायस्कूल येथे समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे, तसेच शिक्षणाची प्रेरणा मिळावी या उद्देशाने आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात विजय देशपांडे यांचे हस्ते साने गुरूजी यांचे प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी केले. इंद्रायणी पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. संजय रेंदाळकर यांनी प्रास्ताविक केले . आपल्या प्रास्ताविकात त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी जाणणारेच खऱ्या अर्थाने समाजसेवा करतात वासू देशपांडेंसारख्या व्यक्ती त्यामुळेच आदर्शवत ठरतात.
यावेळी विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या, लेखनसाहित्याचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे विजय देशपांडे यांनी शिक्षणाच्या माध्यमातूनच उज्ज्वल भविष्य घडविता येते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा नेहा काणकेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमास आंतरभारती शिक्षण मंडळाच्या प्राथमिक विभागाच्या सचिव संध्या वाणी, सचिव भरत अलगौडर,अवधूत खचनाळे, अशोक वरुटे, भरत , सुरेखा पोवार, निलेश बनगे, प्रसाद रेळेकर, सदाशिव रहाटवळ उपस्थित होते .विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. तृप्ती रावराणे यांनी सूत्रसंचालन केले. हेमलतापाटील यांनी आभार प्रदर्शन केले .


