टाकळी रोड हल्ला प्रकरणी सहाजण ताब्यात; ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी

0
1780586778438

मिरज (प्रतिनिधी)
टाकळी रोड परिसरात प्रदीप उर्फ शिव अथणीकर याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत पाच जणांसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. सर्व संशयितांविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मंगळवारी दुपारी अथणीकर याच्यावर तलवार व कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर मिरज शहर व महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यांच्या पथकांनी विशेष मोहीम राबवत मतीन काझी, शौकत शेख, आयान लांडगे, शोएब शेख, शाकिब खान आणि एका अल्पवयीनास ताब्यात घेतले. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांनी प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समोर आल्याचे सांगितले. गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. हल्ल्यामागील नेमके कारण, कटातील इतर संशयित आणि संपूर्ण पार्श्वभूमीचा तपास सुरू आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या मतीन काझी व शौकत शेख यांची नावे यापूर्वीही विविध गुन्ह्यांत समोर आली असून या घटनेमुळे मिरजमध्ये गुन्हेगारी आणि टोळीवर्चस्वाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *