जोया तांबोळीचे राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत धवल यश

0
IMG_20260613_152749

जोया तांबोळीचे राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत धवल यश

कोल्हापूर. ता. 13 (प्रतिनिधी): दि. ८ ते १० जून २०२६ रोजी बेंगलोर येथे संपन्न झालेल्या पॅरा स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया राष्ट्रीय ज्युनिअर व सब ज्युनिअर जलतरण स्पर्धेत राष्ट्रीय जलतरणपटू सागर प्रशांत पाटील जलतरण तलावाच्या जोया तांबोळी हीने ५० मी. ब्रेस्ट स्ट्रोक – रौप्यपदक, ५० मी फ्री स्टाईल-कास्यपदक व १०० मी. फ्री स्टाईल – कास्यपदक मिळवले.

जोयाला प्रशिक्षक अमर पाटील, मानसिंग पाटील, अंकुश पाटील, संतोष डोकरे यांचे मार्गदर्शन मिळाले. ह्या विद्यार्थिनीला रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या मा. सरोज पाटील (माई) महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन तथा जनरल बॉडी सदस्या सौ. संगीता प्रशांत पाटील, जनरल बॉडी सदस्य मा. प्रशांत पाटील, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रोत्साहन लाभले. तिच्या या यशाबद्दल तिच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *