निपाणीतील 1021 जणांना लवकरच घरकुलाचा लाभःआम.शशिकला जोल्ले

0

निपाणी,ता.16(प्रतिनिधी)-
निपाणी मतदार संघात 2013 ते 2026 पर्यंत गेली 13 वर्षे निपाणी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत असताना विकासाचे राजकारण केले आहे. त्यामुळे संपूर्ण मतदार संघाचा भरपूर विकास केला आहे. विकास करताना किवां काम करताना कधीही पक्षपाती काम केलेले नाही. जात, धर्म मानलेला नाही. त्यामुळे निपाणी शहरात राबविण्यात आलेल्या पंतप्रधान घरकुल आवास योजनेत कोणावरही अन्याय होणार नाही. नगरपालिका व तहसिलदार कार्यालयाच्या महसूल विभागाकडून यादीचा पूर्ण सर्व्हे झाल्यानंतर लवकरच 1021 जणांना घरकुलाचा लाभ मिळवून देणारच आणि सामुहिक वास्तूशांतीही आपल्या उपस्थितीच होणार असल्याची माहिती आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली.
निपाणी नगरपालिका सभागृहात आयोजीत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी तहसिलदार सुरेश मुंजे, पालिका आयुक्त गणपती पाटील उपस्थित होते. पुढे बोलताना आम.जोल्ले म्हणाल्या, 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळगलेले स्वप्न साकार करण्यासाठी आपणही निपाणीसाठी ही योजना मंजूर करून घेतली. 2018 जणांची यादी बनविली. त्यानंतर अनेक अडचणींचा सामना करीत कोराना ेकाळांनतर या योजनेला मंत्री सोमणा यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्यानंतर त्याठिकाणी पाणी, रस्ता, गटारी आणि विद्युत पुरवठ्याच्या अनेक समस्या होत्या. त्या पूर्ण करून 600 घरे तयार झाली. त्यानंतर आपण 17 मार्चला लाभार्थींची बैठक घरकुल ठिकाणी बैठक घेतली. यावेळी अन्य लाभार्थींना चार हप्ते भरण्याचे आवाहन केले. त्यानंतर 20 में ला 600 घरांची लॉटरी पध्दतीने वितरणचा कार्यक्रम केला. यावेळी विरोधकांनी गोंधळ घातला. त्यांनतर पालिका अधिकाऱ्यांनी तक्रारीचे आवाहन केले 30 तारखेपर्यत हरकती दाखल करण्याचे आवाहन केले, पण अद्यापही कोणाची तक्रार नव्हती. संपूर्ण हप्ते भरलेल्यांची 1021 जणांची यादी बनविली. यामध्ये 9 जणांची कागदपत्रांची तक्रार होती तीही दूर झाली आहे. येत्या दोन दिवसात तहसिलदार कार्यालयाचा अहवाल येईल त्यानंतर अंतिम यादी प्रसिध्द करून लवकरच घरकुल वितरण केली जातील.
घरकुलबाबत अनेकांनी दिशाभुल करण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण त्यांनी गरीब आणि बेघरांचा तळतळात घेवू नये. 1021 घराबरोबर अन्य 2018 मधील राहिलेल्या लोकांनाही घरे देण्यात येणार आहेत. त्यामुळे गरजूंनी अर्ज व पैसे भरून मागणी केल्यास घरे देण्यात येतील. आतापर्यतच्या यादीत कोणीही बाहेर गांवाचा लाभार्थी नाही. येथील आधार, रेशनकार्ड, आणि सर्व कागदपत्रे असलेल्यांना घरे देण्यात आली आहेत. तक्रार करणाऱ्यांनी लेखी तक्रार द्यावी., गरिबावर अन्याय होणार नाही याची खात्री मी देते. आतापर्यत सर्वांनी माझ्यावर विश्‍वास ठेवला आहे. त्यामुळे विरोधकांनी गरीबांची दिशाभुल करू नये. जनता तुम्हाला हिशोब देईल यात शंका नाही. गरिबांच्या घरकुला राजकारण करू नका लवकर घरकुल वितरण होईल. वयस्कर आणि अपंगांना खालील ठिकाणी घरे दिले जातील. सामुदयीक पध्दतीने मीच उदघाटन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तहसिलदार सुरेश मुंजे यांनी किमान 40 टक्के अंपग असणाऱ्यानीं अपंगाचे प्रमाणपत्र सादर करावा. वयस्कारांनी 65 वर्षाचे प्रमाणपत्र सादर करावे असे आवाहन केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष, जयवंत भाटले, माजी नगराध्यक्ष सुनिल पाटील,संतोष सांगावकर, हालशुगर उपाध्यक्षा गिता पाटील, राजू गुंदेशा, बंडा घोरपडे, प्रणव मानवी, विजय टवळे, सागर मिरजे, योगीता घोरपडे, शांतीनाथ मुदकुडे, प्रशांत केस्ती यांच्यासह नागरीक व नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *