कोरगांवकर हायस्कूलमध्ये  योग प्रात्यक्षिके 

0
कोरगांवकर हायस्कूलमध्ये योग प्रात्यक्षिके

 कोल्हापूर (प्रतिनिधी)   आंतरभारती शिक्षण मंडळ, कोल्हापूर संचलित सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूलमध्ये  योगदिनानिमित्त योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली . योग प्रशिक्षक सदाशिव -हाटवळ आणि इंद्रायणी पाटील तसेच सुरेखा पोवार यांनी ताडासन, मच्छासन, वक्रासन, धनुरासन, भुजंगासन आधी १६ प्रकारची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांसमोर सादर केली.

     या प्रात्यक्षिकात विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांचाही सहभाग होता. सदाशिव -हाटवळ यांनी योगाचे महत्व सांगितले आणि शारिरीक व्याधी दूर होण्यासाठी योग अनिवार्य असल्याने केवळ योगदिनापुरता योग न ठेवता त्यात सातत्य ठेवणे गरजेचे आहे असे सांगितले. योग प्रात्यक्षिकात मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांचेसह ज्येष्ठ शिक्षक बाबासाहेब डोणे, राजेंद्र कुंभार, हेमलता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *