सलगरेतील शिवतेज को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे उत्साहात उदघाटन

0
WhatsApp Image 2026-06-19 at 6.24.00 PM

मिरज (प्रतिनिधी)
गावाच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या शिवतेज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., सलगरे या नव्या पतसंस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाला गावातील नागरिक, सभासद, हितचिंतक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख उपस्थितीत परमपूज्य १०८ शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी (हिसमठ संस्थान, बेळंकी) तसेच सद्गुरू श्री कोंडिबा महाराज उपस्थित होते. त्यांच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत ग्रामीण भागातील आर्थिक स्वावलंबनासाठी अशा संस्थांचे महत्त्व अधोरेखित केले.

या प्रसंगी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील. आ. डॉ. सुरेश (भाऊ) खाडे, उपसरपंच बागामोरे सुतार, लोकनियुक्त सरपंच सौ. जयश्रीताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या कार्यास शुभेच्छा देत ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सहकार क्षेत्राची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले.

संस्थेचे चेअरमन सुहास कंडले, सचिव अनिल माळी व संचालक मंडळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेमार्फत ठेवी, कर्ज, लॉकर सुविधा, एनइएफटी/आरटीजीएस, मोबाईल बँकिंग यांसह विविध सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संचालक मंडळ, सभासद, ग्रामस्थ व सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *