कोरगांवकर हायस्कूल “शाहू” मय ; विविध उपक्रमाने राजर्षिंना अभिवादन
कोल्हापूर.(प्रतिनिधी) येथील आंतर भारती शिक्षण मंडळ संचलित सदर बाजार येथील कोरगांवकर हायस्कूलमध्ये जयंतीदिनी राजार्षि छत्रपती शाहूमहाराज यांना विविध उपक्रमाद्वारे अभिवादन करण्यात आले. प्रारंभी प्रमुख वक्ते बाबासाहेब डोणे आणि मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांचे हस्ते राजर्षि शाहू महाराज आणि दानशूर अनिलपंत कोरगांवकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . प्रमुख वक्ते बाबासाहेब डोणे यांनी राजर्षि शाहू महाराज यांच्या जीवनातील प्रसंग कथन करून विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले .
मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी अध्यक्षीय मनोगतात राजर्षिंच्या लोकराजा उपाधीचे विवेचन केले त्याचप्रमाणे दानशूर अनिलपंत कोरगांवकर यांच्या दानशुरतेच्या आठवणी सांगून त्यांच्या स्मृतिस अभिवादन केले . राजर्षि शाहूंच्या जीवनपटावर आधारित राजर्षि या आयुष काळे याने तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे अनावरण मुख्याध्यापक संजय सौंदलगे, राजाराम संकपाळ, सुरेखा पोवार आणि सारिका ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी इयत्ता दहावी ब या इयत्तेचे वर्गशिक्षक सुभाष बेलवळेकर आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले .तनया देसाई, राधिका साळुंखे, श्रावस्ती मोरे, सोनाक्षी लोखंडे, वीर शिंगे या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधीक मनोगत व्यक्त केले .
साने गुरुजी बालक मंदिर आणि सावित्री श्रीधर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करण्या बरोबरच राजर्षि शाहूंचा वेष परिधान केल्याने कार्यक्रम अधिक आकर्षक झाला . इंद्रायणी पाटील यांच्या मार्ग दर्शनाखाली गीतमंच विभागातील विद्यार्थीनींनी राजर्षि शाहू स्फूर्ती गीताचे गायन केले . उज्वला बुणांद्रे यांनी चिमुकल्या बालकांकडून नृत्याद्वारे शाहू प्रेरणा गीत सादर केले . गौरव पोवार याने आभार प्रदर्शन केले . याप्रसंगी हेमलता पाटील, तृप्ती रावराणे, मीना बुचडे, शीतल गणेशा चार्य, प्रभूप्रसाद रेळेकर, राजेंद्र कुंभार, सलिम मणियार, सतिश नंदनवार आदी मान्यवरांसह कोरगांवकर संकुलातील शिक्षक वृंद उपस्थित होते .
राजर्षि या भित्तीपत्रकाचे अनावरण करताना कोरगांवकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे, सुरेखा पोवार, सुभाष बेलवळेकर, सारिका ढेरे, राजाराम संकपाळ आदी


