मिरजेत वखार भागातील रस्त्याचे मुरमीकरण सुरू

0
IMG-20260703-WA0079

खासदार विशाल पाटील यांचा निधी ; महापालिकेकडून सव्वा कोटी मंजूर
मिरज (प्रतिनिधी)

मिरजेत मागील ५ ते ७ वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे मुरमीकरण नगरसेवक संजय मेंढे यांच्या प्रयत्नाने अखेर सुरू झाले आहे. खासदार विशाल पाटील यांच्या निधीतून बारा लाख रुपये मिळाल्याने कामाला सुरुवात झाली आहे. प्रभाग ५ मधील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक संजय मेंढे व बबीता मेंढे यांनी या कामासाठी पाठपुरावा केला. रस्त्याचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी नगरसेवकांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला. या रस्त्यासाठी महापालिकेकडे सव्वा कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला असून तो मंजूर झाला आहे. सव्वा कोटी निधी रस्त्यास मिळाला आहे. मात्र पावसाळा असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरूपात मुरमीकरण करण्यात येत आहे.

मिरजेत वखार भागातील ड्रेनेज पंपिंग स्टेशन समोरील मंडले पेट्रोल पंप ते वखार भाग झोपडपट्टी रस्त्याची मोठी दुरावस्था झाली होती. या ठिकाणी शहरातील ड्रेनेच्या ३ पाईपलाईन आहेत. त्या जमिनीखाली २५ ते ३० फूट खोलीवर आहेत. तसेच हा भाग उताराचा व काळ्या मातीचा असल्याने रस्ता मोठ्या प्रमाणात खचला होता.

या ठिकाणी झोपडपट्टी असल्याने ड्रेनेजचे काम करता येत नव्हते. तसेच रस्त्याच्या दुतर्फा झोपडपट्टी असल्याने पाण्याची पाईपलाईन रस्त्याच्या मध्यभागी टाकण्यात आली होती. या ठिकाणी रस्त्याचे काम, ड्रेनेजचे काम करण्यासाठी झोपडपट्टीचे स्थलांतर करणे गरजेचे होते. नगरसेवक मेंढे यांनी येथील झोपडपट्टी मधील रहिवाशांना विश्वासात घेऊन, त्यांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून देऊन स्थलांतर केल्यानंतर येथील कामाला गती मिळाली. येथील पाण्याची पाईपलाईन रस्त्याच्या एका बाजूला घेऊन ड्रेनेजच्या पाईपलाईनचे काम करण्यात आले.

येथील ड्रेनेज काम सुरू असल्याने अनेक वर्षांपासून रस्ता होऊ शकला नाही. हा रस्ता रहदारीसाठी बंद असल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. लांब अंतरावरून नागरिकांना ये जा करावी लागत होती. रस्त्याचे काम तातडीने करावे अशी मागणी नागरिकांची होती. महानगरपालिकेकडे संजय मेंढे यांच्या प्रयत्नाने रस्त्यासाठी सुमारे सव्वा कोटी रुपये निधीचा प्रस्ताव मजूर आहे. मात्र पावसाळ्यामुळे त्यास विलंब होणार असल्याने संजय मेंढे यांनी खासदार विशालदादा पाटील यांच्याकडे निधीची मागणी केली होती. खासदारांकडून निधी मिळाल्याने रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

परिसरातील नागरिकांसाठी रस्त्याची गरज लक्षात घेऊन संजय मेंढे यांनी महानगरपालिकेकडे सव्वा कोटी रुपये निधीसाठी प्रस्ताव देऊन त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यास मंजुरी प्राप्त केली आहे. महानगरपालिका स्थायी समितीकडून निविदा प्रक्रियेसाठी आवश्यक मंजुरी व स्थायी समितीचा ठराव संजय मेंढे यांच्या प्रयत्नामुळे मिळाली आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. येथील रस्ता सव्वा कोटी निधीतून चांगल्या दर्जाचा बनवून नागरिकांची गैरसोय लवकरच दूर केली जाईल, असे नगरसेवक संजय मेंढे यांनी सांगितले.

परिसरातील नागरिकांनी नगरसेवक संजय मेंढे, बबीता मेंढे व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले. यावेळी सहदेव कौलापुरे, बबन बरगाले, बापूसो धुळूबुळू, संभाजी मेंढे, गणपती मेंढे, लक्ष्मण हलवाई, तानाजी किनिकर, संभाजी कोरे, आयुब बारगीर, डॉ. ईश्वर कोरे, हमीद शेख, सुनील व्हरकल, राजू व्हरकल, प्रवीण भंडारे, उद्धव ठोंबरे, रमेश मंडले, सागर माळी, रवी बरगाले, सागर लांडगे, इब्राहिम पालेकर, राजू कोरे व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *