मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या- डॉ. महेशकुमार कांबळे

0
WhatsApp Image 2026-07-24 at 10.10.32 PM

मिरज (प्रतिनिधी)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज यास “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज” असे नामकरण करण्यात यावे, या मागणीचे निवेदन भाजपा नेते डॉ. महेशकुमार कांबळे यांनी आज आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्याकडे सादर केले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ही मागणी कोणत्याही एका समाजापुरती मर्यादित नसून शिक्षण, संविधानिक मूल्ये, सामाजिक न्याय आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रनिर्माणातील अतुलनीय योगदानाला अभिवादन करण्याच्या व्यापक भावनेतून करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने या वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण झाल्यास विद्यार्थी, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्ती तसेच समाजाला त्यांच्या विचारांचा प्रेरणादायी वारसा जपण्याची संधी मिळेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या मागणीला सर्व स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि महाराष्ट्र शासन लवकरच याबाबत योग्य निर्णय घेऊन नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करेल, अशी अपेक्षा डॉ. महेशकुमार कांबळे यांनी व्यक्त केली आहे. तसेच, आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या माध्यमातून ही मागणी शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचेल आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे या नामकरणाचा निर्णय निश्चितच मार्गी लागेल, असा ठाम विश्वासही डॉ. कांबळे यांनी व्यक्त केला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा