सांगलीकरांची हास्याची वारी पंढरीच्या दारी ; वृषभ आकिवाटे यांची विना मोबदला सेवा
मिरज (प्रतिनिधी)
वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्यासाठी झी मराठी चला हवा येऊ द्या फेम सांगलीचे हास्य कलाकार वृषभ आकिवाटे यांनी विना मोबदला हास्य विनोद कार्यक्रम सादर करून वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलविले. या विना मोबदला हास्य सेवा उपक्रमाचे हे चौथे वर्ष होते. मिरज – पंढरपूर मार्गावरती कडलगे गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर येथील वारकरी निवासासाठी होते. यावेळी श्री सुखेश्वर हनुमान मंदिर मालगाव येथे वृषभ यांनी रात्री हास्य सेवा केली.
मुळगाव वारकरी संस्था गोवा येथील वारकरी तासगाव फाटा मिरज येथे दुपारच्या वेळेस वारकऱ्यांच्या करिता हास्य विनोद सादर केले. याप्रसंगी वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमातून आमचा उत्साह वाढला असून थकवा दूर झाल्याचे गोवा येथील वारकरी महेश्वर गडेकर यांनी सांगितले. कार्यक्रमास राजेंद्र कोठावळे, प्रा. पी.बी. पाटील, एस, के, पाटील, संजय दानोळे यासह सर्व वयोगटातील वारकरी उपस्थित होते.


