मिरजेत विठ्ठलनामाच्या गजरात पोदार स्कूलमध्ये रंगला आषाढी एकादशीचा सोहळा

0
WhatsApp Image 2026-07-28 at 9.34.15 AM

सांगली (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
पोदार स्कूल मिरज व पोदार प्रेप मिरज येथे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यावेळी सर्व विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने आणि भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

कार्यक्रमाची सुरुवात पालखी पूजनाने झाली. यावेळी पोदार स्कूल मिरजच्या प्राचार्या सौ. कविता नाडे तसेच पोदार प्रेप मिरजच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ. प्राजक्ता घोटीकर यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. यानंतर इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी अभंग व भक्तिपर गीतांचे सादरीकरण केले. इयत्ता पहिली, दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी संतांची वेशभूषा परिधान करून विविध संतांविषयी माहिती सांगितली. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

पारंपरिक पालखी सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी फुगड्या खेळल्या तसेच लेझीमचे सादरीकरण करून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संत परंपरा, वारकरी संप्रदाय आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व अनुभवता आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *