निपाणीजवळ पुणे-बेगलोर राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे ः भराव कोसळला

0
IMG_20260729_115353

filter: 0; jpegRotation: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; module:29facing:0; hw-remosaic: 1; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; sceneMode: Auto; cct_value: 0; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 0.0; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;

निपाणी,ता.29(प्रतिनिधी)-
पुणे-बेगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाला प्रारंभ झाल्यापासून या महामार्गाच्या कामाच्या तक्रारी आणि कामातील अनेक त्रुटीने सर्वजणच त्रस्त झाले आहेत. या कामामुळे महार्गावरील अनेक गांवाना अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागत आहेत. त्यातच अनेक वेळा निकृष्ठ कामाबाबातही नागरीकांच्या तक्रारी आहेत. पण या तक्रारीकडे कोणीही लक्ष दिलेले नसून हे काम करणारी कंत्राटदार कंपनी आपला निकृष्ठ कामाचा ठेका चालवितच आहे. यावर कळस म्हणून आज निपाणी शहराजवळ आंबेडकर भवनाजवळील महामार्गावर मुख्य रस्त्याचा भरावच कोसळला असल्याने या कामाचा निकृष्ठपणाचा कळस गाठला आहे.बुधवारी सकाळी हा भराव कोसळल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला.महामार्गावरून 24 तास जड वाहनांची वर्दळ सुरू होणार आहे.अशा गजबजलेल्या रस्त्यावरील पुलाचा भराव तुटल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उड्डाणपूल दुरुस्तीचे काम सुरू असतानाच पहिल्या-दुसऱ्या पावसातच भराव कोसळलल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंत्राटदाराच्या कारभारावर मोठे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.भराव बांधताना योग्य दर्जाचे साहित्य वापरले गेले नाही. तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था न केल्यानेच हा भराव खचला आहे,“ असा थेट आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.महामार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक वाहनधारकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीचे काम सुरू केल्यापासून अनेक तक्रारी आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम निकृष्ठ झाले आहे. अनेक गांवाना महामार्गापासून जोडणारे रस्ते व्यवस्थीत केलेले नाहीत. गटारी अर्धवट केंल्या आहेत. निपाणी शहरात कोल्हापूरकडून प्रवेश करणार रस्ता अर्धा डांबरीकरण आणि अर्धा कच्चा केला आहे. उडाणपुलाजवळ गटारीव स्लॅब घातला आहे, पण रस्ता केलेला नाही. अशा अनेक तक्रारीने नागरीक त्रस्त होवून वैतागले आहेत. पण याची दखल कोणीही घेत नाहीत. किवा तक्रार केली तर कोण लक्ष देत नाहीत असा प्रकार या कामाचा होवून बसला आ
हे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *