मिरजेतील आयडियल स्मार्ट स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

0
WhatsApp Image 2026-07-29 at 10.12.15 AM

मिरज (प्रतिनिधी)
मिरजेतील आयडियल स्मार्ट स्कूलमध्ये व्यास पौर्णिमेनिमित्त गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी गुरुवंदना सादर करून शिक्षकांना वंदन केले. पाद्यपूजन, टिळा व पुष्प अर्पण करून गुरूंचा आशीर्वाद घेण्यात आला.

मुख्याध्यापिका सौ. ममता भोकरे यांनी गुरुंचे जीवनातील महत्त्व स्पष्ट केले, तर समन्वयक विश्वास पाटील यांनी गुरू-शिष्य परंपरेवर मार्गदर्शन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. अनुजा ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गीत, प्रार्थना व लघुनाटिका सादर केली. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुरुंबद्दल आदरभाव आणि भारतीय संस्कृतीची जाणीव अधिक दृढ झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *