भराव कोसळल्याची तक्रार नितीन गडकरींच्याकडे करणार ः आम.शशिकला जोल्ले
निपाणी,ता.29(प्रतिनिधी)-
निपाणीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणारे कंत्राटदाराने दर्जात्मक काम केलेले नाही.आधुनिक तंत्रजानाचा वापर करून काम होत असताना भराव कोसळला कसा असा जाब विचारत आमदार शशिकला जोल्ले यांनी या कामाची तक्रार नाम नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले. निपाणीत महामार्गाचा भराव कोसळल्याचे समजताच त्यांनी घटनास्थळी पाहणी करून अभियंते विजय दार्इंगडे यांना सुचना देवून नागरीकांच्या सुरक्षितेची काळजी घेण्यास सांगितले.
यावेळी बोलताना आम.जोल्ले म्हणाल्या केंद्र सरकारने राष्ट्रीय महार्गावर चांगले दळणवळण होण्यासाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पण हे काम करणारे कंत्राटदाराने येथे निकृष्ठ काम केंल्याने भराव कोसळला आहे. मुख्य म्हणजे या रस्त्यावरून वाहतूक सुरू नसताना भराव कोसळला आहे. यावेळी अभियंते विजय दार्इंगडे यांनी या ठिकाणी पाणी मुरल्याने भराव कोसळल्याचे कारण सांगितले. राष्ट्रीय महामार्गासारखा रस्ता असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. मग असल्या किरकोळ कारणे सांगण्याचा प्रकार म्हणजे निकृष्ठ कामाचा दर्जाच म्हणावा लागेल. त्यामुळे हे कामाची सखोल चौकशी करण्यासाठी वरिष्ठांना सागण्यात आले आहे. तर हे काम करणारा कंत्राटदार प्रमोद चेंडके हा आपला फोनही उचलत नाही. आजारी असल्याचे कारण सांगत आहे. त्याला लोकांच्या जीवन मरणाचा काय विचार नसल्याने असे काम करीत असल्याचे आमदार जोल्ले यांनी सांगून आपण केदीय रस्ते निर्माण व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आपण प्रत्यक्ष भेटून तक्रार करणार आहे.
शहरात जाणाऱ्या या परिसरातील एक किलो मिटरपर्यतचा रस्ता अशा प्रकारे झाला आहे. त्यामुळे हा एक किलो मिटरचा रस्ता चांगल्याप्रमाणे करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुनिल पाटील, माजी सभापती राजू गुंदेशा, प्रणव मानवी, प्रशांत केस्ते, बंडा घोरपडे, प्रविण तारळे, अभिनंदन मुदकुडे, रवि कदम, सुरज खवरे, विनायक खोत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


