मिरजेतील सचिन हॉस्पिटल येथे रविवारी मोफत स्त्रीरोग मार्गदर्शन शिबिर

0
unnamed

मिरज (प्रतिनिधी)

मिरजेतील सचिन हॉस्पिटल (टेस्ट ट्यूब बेबी सेंटर) यांच्यावतीने रविवार (दि.२३) फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायं. ४ या वेळेत मोफत वंध्यत्व निवारण व स्त्री रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. सचिन सुगण्णावर व व डॉ.सौ.नेहा सुगण्णावर यांनी दिली.

यावेळी डॉ. सचिन सुगण्णावर म्हणाले, मूल न झालेल्या दाम्पत्यांवर व स्त्रियांमधील सर्व आजारांवर हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने उपचार केले जातात. सचिन हॉस्पिटल हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण (टेस्ट ट्यूब बेबी) सेंटर आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून सचिन हॉस्पिटलतर्फे स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण मार्गदर्शन शिबिराचे सातत्याने आयोजन करण्यात येते. (दि.२३) फेब्रुवारी रोजी घेण्यात येणाऱ्या या शिबिरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ञ डॉक्टरांचे पथक सहभागी होणार आहे. या शिबिरामध्ये सवलतीत सोनोग्राफी, औषधे दिली जातील. रुग्णांना आधुनिक उपचार व शस्त्रक्रियेचा अत्यल्प दरामध्ये लाभ मिळेल. पुढे ते म्हणाले, हॉस्पिटलमध्ये टेस्ट ट्यूबबेबीची आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रयोगशाळा आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आहे. कर्नाटक सीमाभागातील रुग्णांना हॉस्पिटलमधील औषधोपचार व टेस्टट्यूब बेबी तंत्रज्ञानाने अपत्यप्राप्ती लाभली आहे. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी – लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सुगण्णावर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *