करजगी घटनेतील आरोपीचे वकीलपत्र घेऊ नका ; ‘मदनी’ ट्रस्टची सांगली जिल्हा बार असोसिएशनकडे विनंती

सांगली (प्रतिनिधी)
करजगी घटनेतील नराधम आरोपीचे कुणीही वकीलपत्र घेऊ नये अशी विनंती सांगली जिल्हा बार असोसिएशनला मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. जत तालुक्यातील कराजगी या गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे.संपूर्ण समाजातून आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.जिल्हा पोलीस प्रशासनाने 15 दिवसांत आरोपपत्र न्यायालयात हजर करून फास्ट ट्रॅक वरती खटला चालविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. या घटनेतील आरोपीचे वकीलपत्र सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कोणत्याही बार असोसिएशनच्या वकील बांधवाने घेऊ नये अशी मदनी चॅरिटेबल ट्रस्टने केली आहे.
या वेळी सांगली जिल्हा बार एसोसिएशनचे अध्यक्ष ॲड.किरण रजपूत, ॲड.दीपक शिंदे, ॲड. भाउसो पवार, ॲड.राजेंद्र भाले, ॲड.फारूक मुजावर, ॲड.आर.आर पाटील तसेच मदनी चैरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी हाफिज सद्दाम सय्यद, सुफियान पठान, इमरान बेग ,हाफिज इलियाज, अजहर सय्यद, हाजी मुबारक सनदी, मौलाना साहील, अफजल मोमिन, सलमान शेख आदि उपस्थित होते.