आष्ट्यात राष्ट्रवादी युवक तर्फे शिवजयंती साजरी

आष्टा प्रतिनिधी (तानाजी टकले)
येथील आष्टा शहर राष्ट्रवादी युवक शरद पवार पक्षाच्या वतीने अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.मूर्तीचे पूजन आष्टा शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शिवाजीराजे चोरमुले यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मा.अध्यक्ष दिलीपराव वग्यानी, राजाराम बापू दूध संघांचे व्हा.चेअरमन संग्राम फडतरे, राजाराम बापू पाटील साखर कारखाण्याचे संचालक , रघुनाथ जाधव,राजू माने अध्यक्ष, प्रविण वारे,मा नगरसेवक प्रभाकर जाधव मा.नगरसेवक, दीपक मेथे,प्रकाश सिद्ध,,तोफिक कुलकर्णी , संदीप खोत , गोटू थोटे, युवकचे उपाध्यक्ष ,संदीप माने , भैय्या माने ,अभी परीट,प्रेम वारे,अभी तानगे,मोहसीन भैया, पोपट माळी व शिवभक्त उपस्थित होते.