कापरी येथे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रम

सांगली (प्रतिनिधी)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक साक्षरता सप्ताहच्या अंतर्गत स्वाधार फिनएक्सेस या संस्थेमार्फत श्री जानाई मंदिर कापरी येथे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रम तसेच बँकेतील विविध सरकारी योजनांसाठी शिबीर आयोजित करण्यात आले. या आर्थिक साक्षरता कार्यक्रमात बँकेच्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली तसेच फसवणुकीचे प्रकार आणि त्यापासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर प्रधानमंत्री सुरक्षा विमा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजनाची सविस्तर माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमानंतर उपस्थित ग्रामस्थांनी विविध योजनांचे फॉर्म भरुन लाभ घेतले. कार्यक्रमासाठी कापरी गावच्या महिला बचत गट सीआरपी उज्ज्वला पाटील यांचे सहकार्य लाभले. स्वाधार संस्थेचे प्रशिक्षक योगेश पाटील यांनी येथील महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी बँक ऑफ इंडियाचे आर्थिक प्रशिक्षक दीपक क्षीरसागर, स्वाधार संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक तौफिक काझी, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, कृषी सखी आयुष्मान भारत योजनेचे अधिकारी उपस्थित होते.