शित्तूर वारूणच्या तिघांची पोलीस दलासह एमएसएफ मध्ये निवड

शित्तूर – वारुण (प्रतिनिधी)
शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर – वारुण येथील महादेव पाटील यांची राज्य राखील दलात पोलीस शिपाई पदी तर विनायक पाटील आणि संकेत पाटील यांची महाराष्ट्र राज्य रेस्क्यू फ़ोर्स (MSF) मध्ये रेस्क्यू कमांडो पदी निवड झाल्याने परिसरातून अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.
महिन्याभरापूर्वी मुंबई पोलीस भरतीचा निकाल जाहीर झाला होता. त्यामध्ये गावातील दिव्या राऊत, गणेश भोसले आणि चैतन्य साळुंखे यांनी यश मिळवले तर कु. महादेव केशव पाटील यांची पुणे पोलीस दलात (एस. आर. पी. एफ.) मध्ये निवड झाली. महाराष्ट्र सोल्जर फोर्स /महाराष्ट्र राज्य रेस्क्यू फोर्स (MSF) मध्ये रेस्क्यू कमांडो म्हणून कु.विनायक चंद्रकांत पाटील आणि कु.संकेत राजाराम पाटील यांची निवड झाली. ध्येयाने प्रेरित होऊन रात्रं -दिवस सातत्याने सराव आणि अभ्यास करणाऱ्या या तरुणांच्या निवडीने शित्तूर-वारुण आणि परिसरात कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.