मिरजेतील विद्यार्थ्यांकडून दंडोबा परिसर प्लास्टिक मुक्तीचा प्रयत्न

0
WhatsApp Image 2025-03-06 at 3.44.15 AM

मिरज (प्रतिनिधी)
येथील दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटी मार्फत दंडोबा डोंगर व परिसर, प्लास्टिक मुक्त करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी विनायक गोखले, चंद्रशेखर मराठे, राजू झाडबुके, कुंभार, शिक्षक तसेच श्री बळवंतराव मराठे विद्यालय व श्री दिनकरराव गोखले प्राथमिक विद्यालय मिरज या शाळांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

यावेळी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष विनायक गोखले व शाला समितीचे चेअरमन चंद्रशेखर मराठे म्हणाले की, दंडोबा क्षेत्र भेटीसाठी येणाऱ्या भाविकांनी व पर्यटकांनी दंडोबा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. दंडोबा वर खाद्यपदार्थ विकणाऱ्या स्टॉल धारकांनी प्लास्टिक कचरा वेगळा करण्यासाठी डस्टबिनचा वापर करावा, दंडोबा परिसरात प्रवेश करतेवेळी चेक पोस्ट असणे गरजेचे आहे. निर्माण होणारा प्लास्टिकचा कचरा व त्यामुळे होणारे प्रदूषण याबाबत प्रबोधन होणे महत्त्वाचे आहे. शासनाने पर्यटन स्थळांवर प्लास्टिक वापरावर मर्यादा आणावी व काही बंधने घालावीत. इथून पुढे भविष्यात दंडोबा परिसर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी संस्थेचे सातत्यपूर्ण प्रयत्न राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *