मिरजेतून मोटारसायकल चोरणार्‍या दोघांना कर्नाटकातून अटक; गांधी चौक पोलिसांची कारवाई

0
WhatsApp Image 2025-03-07 at 7.35.38 AM

मिरज (प्रतिनिधी)

शहरातून मोटरसायकल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना महात्मा गांधी चौक पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली. संजू यमनाप्पा मादर (वय 23 रा. कोलार जि.विजापूर कर्नाटक) आणि चंद्रशेखर उर्फ चेतन मल्लाप्पा मुंदीनमनी (वय 23 रा. नागरदींनी ता. कोल्हार, जि. विजापूर कर्नाटक) अशी आरोपींची नावे आहेत.

अधिक माहिती अशी कि, मिरजेतील निपाणीकर कॉलनी या ठिकाणाहून एक यामाहा कंपनीची मोटार सायकल चोरी करण्यात आली होती. याबाबतची फिर्याद सालीब मुस्तफा शेख (रा. निपाणीकर कॉलनी मिरज) यांनी 23 फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजता महात्मा गांधी चौक पोलिसांना दिली होती. सदर फिर्यादीच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलिसांनी तपासास सुरुवात केली. पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस सदर मोटार सायकल चोरटे कर्नाटक मध्ये असल्याची माहिती मिळाली. दोघांना पोलिसांनी कर्नाटकातील कोलार येथून ताब्यात घेतले. मिरजेतून चोरी केलेली यामाहा कंपनीची दुचाकी ही पोलिसांनी हस्तगत केली. सदरची कारवाई गांधी चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गुरव, उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, शंकर गायकवाड, अभिजीत धनगर, सुरज पाटील, राजेंद्र हारगे, बसवराज कुंदगोळ, विनोद चव्हाण, जावेद शेख, मोहसीन टिनमेकर, सुधीर खोंदरे, निवास माने यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *