दास संस्थेने छोट्या वैज्ञानिकांना लिटिल सायंटिस्ट 2K25 च्या माध्यमातून दिले व्यासपीठ- प्रा. डॉ. भास्कर ताम्हणकर

0
WhatsApp Image 2025-03-07 at 5.06.41 AM

मिरज (प्रतिनिधी)

आजची पिढी खूप प्रगत व हुशार आहे. त्यांना नवनवीन आव्हानांना सामोरे जाणे आवडते. यासाठी दास संस्थेच्या माध्यमातून ही लिटिल सायंटिस्ट 2K25 स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरते. हे व्यासपीठ मिळाल्याने विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागणार आहे असे प्रतिपादन प्रा. डॉ. भास्कर ताम्हणकर यांनी केले. विज्ञान दिनाचे औचित्य साधत दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था, सांगली यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन व छोट्या वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी तालुकास्तरीय विज्ञान उपकरण निर्मिती स्पर्धेचे म्हणजे लिटल सायंटिस्ट 2K25 चे आयोजन केले होते, यावेळी ते बोलत होते.

या स्पर्धेसाठी मिरज तालुक्यातील ४० शाळेतील २५० मुलांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे आयोजन आ.सुरेशभाऊ खाडे यांच्या दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था यांनी केले. यासाठी संस्थेच्या अध्यक्षा स्वाती सुशांत खाडे यांनी विशेष प्रयत्न केले व त्यांना मुख्याध्यापिका संगीता पाटील व इतर शिक्षकांचे सहकार्य लाभले.

या स्पर्धा संस्थेच्या मालगावमधील सभागृहात अत्यंत उत्साही वातावरणात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन व परीक्षण विलिंग्डन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर, डॉ. सुहासराव खांबे, डॉ. नरसिंह पडळ, डॉ. दत्तात्रय यडगे, सुनील देशपांडे व डॉ. हेमंत अग्निहोत्री आदींनी केले. मुलांनी केलेल्या उपक्रमामध्ये अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल कुपवाड यांच्या स्मार्ट होम या उपक्रमास प्रथम क्रमांक मिळाला. यामध्ये एकनाथ माने, यश खोत, कृष्णा सोनी , सृष्टी यादव यांचा सहभाग होता. खाडे इंग्लिश स्कूल मिरज यांच्या स्मार्ट डस्टबीन या उपक्रमास द्वितीय क्रमांक मिळाला. यामध्ये अनिश रुकडे, आयुष रुकडे व गुरुराज देसाई यांचा सहभाग होता. एस . एम. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मालगाव यांच्या पर्यावरण मित्र या उपक्रमास तृतीय क्रमांक देण्यात आला. यामध्ये कार्तिक खोलखुबे व सौरभ हाक्के यांचा सहभाग होता.  

उत्तेजनार्थ पाहिले बक्षीस एस . एम. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मालगाव यांच्या पर्यावरण पूरक ऊर्जा बचत शेती उपक्रमास देण्यात आले. यामध्ये शुभम माने व अभय कारळे यांचा सहभाग होता. तर उत्तेजनार्थ दुसरे बक्षीस ज्ञान प्रबोधिनी प्रशाला सांगली यांच्या चंद्रयान उपक्रमास मिळाला.  हा उपक्रम स्वरा कोळी हिने  बनवला होता. प्रथम क्रमांकाला ₹१०,०००/- व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाला ₹७०००/- व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकाला ₹५०००/- व प्रमाणपत्र, तर उत्तेजनार्थ रोख ₹२०००/- ची दोन बक्षीसे व प्रमाणपत्र तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सुमनताई खाडे व परीक्षकांच्या हस्ते देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *