हरवलेली सोन्याची अंगठी २४ तासाच्या आत शोधुन काढली ; मिरज शहर पोलीसांची कामगिरी

0
IMG-20250310-WA0015

मिरज (प्रतिनिधी)

मिरजेतील रेहमतुल्ल्हा हॉटेलमध्ये तासगाव चिंचणी येथील राहुल पंडीत गायकवाड हे जेवायला गेले असता त्यांची ९९ हजार ५०० रुपयांची एक तोळ्याची अंगठी हरवली होती. मिरज शहर पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधारे अंगठी शोधून गायकवाड यांना परत केली. पोलिसीच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

तासगाव चिंचणी येथील राहुल पंडीत गायकवाड हे जेवण करण्याकरीता त्यांचे मित्रांसह मिरजेतील रेहमतुल्ल्हा हॉटेल येथे आले असताना त्यांचे हातातील ९९ हजार ५०० रुपयांची ०१ तोळा वजनाची अंगठी कुठेतरी पडुन हरवली होती. सर्वत्र शोध घेवुनही त्यांनी त्यांची अंगठी मिळुन आली नाही म्हणुन त्यांनी मिरज शहर पोलीस ठाणेस येवुन सदर बाबत तक्रार दिली. मिरज शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी त्यांचे तक्रारीची तात्काळ दखल घेत मिरज शहर पोलीस ठाणेचे पो.शि. स्वप्नील नायकोडे, सुरेश वाघमारे, अमित मोरे, लक्ष्मण कौजलगी, श्रीकांत केंगार असे पथक सुचना देवुन सदर अंगठीचा शोध घेण्याकरीता रवाना केले. सदर पथकाने तात्काळ रहमतुल्ल्हा हॉटेल येथे जावुन तेथील सर्व सीसीटीव्ही तपासुन त्याआधारे सर्च ऑपरेशन राबवले असता गायकवाड यांची हरवलेली अंगठी ही हॉटेलमधील डस्टबीनमध्ये पोलीसांना मिळुन आली.

सदरची अंगठी ही गायकवाड यांचीच असल्याची खात्री करुन पोलीसांनी सदर अंगठी राहुल पंडीत गायकवाड यांना परत केली. यावेळी राहुल पंडीत गायकवाड यांनी पोलीसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळेच त्यांची अंगठी त्यांना परत मिळाली असे मत व्यक्त करुन पोलीसांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *