राज्यस्तरीय कथाकथन आणि काव्यवाचन स्पर्धेत साळुंखे महाविद्यालयाची ऋता डांगे प्रथम

मिरज (प्रतिनिधी)
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज येथे बी.ए. भाग 2 मध्ये शिकणारी कु. ऋता डांगे या विद्यार्थिनीने राज्यस्तरीय कथाकथन आणि काव्यवाचन या दोन्ही स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवत घवघवीत असे दुहेरी यश संपादन केले असून तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर आणि दत्ताजीराव कदम आर्टस, सायन्स, कॉमर्स महाविद्यालय, इचलकरंजी मराठी विभाग यांच्यातील सामंजस्य कराराअंतर्गत संयुक्त विद्यमाने या आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय कथाकथन आणि काव्यवाचन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले हेाते.
कु. ऋता डांगे ही महाविद्यालयाची गुणी विद्यार्थिनी असून यापूर्वी देखील महाविद्यालयीन, विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय अशा विविध स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये मराठी वक्तृत्व स्पर्धा ,इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा, एकपात्री अभिनय वादविवाद स्पर्धा, युवा महोत्सव लोकनृत्य अशा अनेक विविध स्पर्धांमध्ये नेहमीच आघाडीवर राहिली आहे. शिवाय राष्ट्रीय कॅडेट कोर (NCC)मधील ती बेस्ट कॅडेट असून ‘ बी ’ आणि ’ सी ’ सर्टिफिकेट परीक्षेत ‘ A ‘ श्रेणी संपादन केले आहे. शिवाय उत्तम राज्यस्तरीय बास्केटबॉल खेळाडू आहे. शिवाजी विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना आयोजित विद्यापीठस्तरीय कॅम्पमध्ये सक्रीय सहभाग घेऊन विद्यापीठाचे नेतृत्व करत भित्तीपत्रिका स्पर्धा त्याचबरोबर पारंपरिक वेशभूषा स्पर्धांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकाचे यश मिळवले आहे. यासाठी तिला तिची आई हेड कॉन्स्टेबल रमा डांगे शिवाय महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. अनिल पाटील व इतरांचे मार्गदर्शन लाभत आहे.