मिरजेत दर्गा पुजारी समाज तर्फे २७ वा रोजा इफ्तार; हिंदू बांधवांचा मोठा प्रतिसाद

0
IMG-20250328-WA0021

मिरज (प्रतिनिधी)

येथील हजरत सय्यद ख्वाजा शमना मीरा दर्गा मध्ये दर्ग्याच्या पुजारी समाज म्हणजेच खादीम समाजातर्फे २७ वा रोजा सोडण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. सर्व हिंदू बांधवांना २७ वा रोजा सोडण्यासाठी येण्याचे आवाहन पुजारी समाज तर्फे करण्यात आलेले होते. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने हिंदू बांधव २७वा सोडण्यासाठी आलेले होते. फडके क्लासेसचे संचालक प्रा. डॉ. रवींद्र फडके यांनी व त्यांची पत्नी मीनाक्षी यांनी २७ वा रोजा ठेवलेला होता.


असंख्य मुस्लिम बांधव गणेशोत्सव उत्साहाने सहभागी होतात व धार्मिक सलोखा राखला जातो त्याच पद्धतीने रमजान महिन्यातील मोठा रोजा म्हणजे २७ वा रोजा हे अनेक हिंदू बांधव करतात ही मिरजेची मोठी परंपरा आहे. आणि या परंपरेला शोभेल असे रोजा सोडण्याचा कार्यक्रम दर्ग्याच्या खादिम समाजातर्फे म्हणजेच दर्ग्याच्या पुजारी समाजातर्फे केला गेला. याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत होते. मिरज धार्मिक सलोखा व सर्वधर्मसमभाव त्याचे आगळे वेगळे उदाहरण आहे असे मत अँड नजीर इनामदार यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *