ग्रामीण स्वयंरोजगारमार्फत कागदी पिशव्या, लखोटे व फाईल बनवणे कार्यशाळा उत्साहात

0
WhatsApp Image 2025-03-29 at 7.14.13 AM

मिरज (प्रतिनिधी)

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सांगली, पंचायत समिती शिराळा जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडिया च्या बी.ओ.आय. स्टार सांगली आरसेटी यांच्या संयुक्त विद्यमाने वाकुर्डे बुद्रुक, शिराळा येथे १० दिवस मोफत ” कागदी पिशव्या, लखोटे व फाईल बनवणे” ही प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. ग्रामीण भागातील युवक-युवतींना एक कुशल उद्योजक बनवण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न असलेल्या युवक-युवतींचे उत्पन्न वाढावे, त्यांनी स्वयंरोजगार करावा या उद्देशाने सदर प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षक राजेंद्र बोरगावे यांनी “कागदी पिशव्या, लखोटे व फाईल बनवणे व्यवसायातील संधी आणि प्रात्यक्षिके घेतली या सोबत आरसेटी चे प्रशिक्षक प्रविण पाटील यांनी व्यक्तिमत्त्व विकास, उत्तम संभाषण कौशल्य, उद्योजकीय सक्षमता व बँकेचे व्यवहार आणि विविध शासकीय योजने बाबत माहिती आणि मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणाचे उद्घाटन ग्रामपंचायत वाकुर्डे बुद्रुक येथे तर निरोप समारंभ संस्थेअंतर्गत मिरज येथे आयोजित केला गेला. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर परीक्षक तृप्ती पतंगे व प्रदीप करंदीकर, आरसेटी निदेशक महेश पाटील, आर्थिक साक्षरता केंद्र प्रमुख दीपक क्षीरसागर तर प्रशिक्षक प्रदीप साळुंखे, प्रविण पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *