मिरज आगार मध्ये अद्यावत नवीन पाच बसेस दाखल ; खासदार-आमदारांच्या उपस्थितीत लोकार्पण

0
FB_IMG_1743514091450

मिरज (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, मिरज आगारच्या ताफ्यामध्ये अद्यावत बीएस 6 या नवीन पाच बसेचे उदघाटन माजी कामगार मंत्री आ. डॉ. सुरेश खाडे, खा. विशाल पाटील आणि आ. इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर खासदार विशाल पाटील आणि आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी या एसटी बस मधून प्रवास केला.

आ. खाडे यावेळी म्हणाले, मिरज आणि परिसरातील नागरिकांना अधिक सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवास अनुभवता यावा, यासाठी या बसेस उपलब्ध करून देताना आनंद होतो आहे. या नवीन बसेस प्रदूषण नियंत्रणासोबतच इंधन कार्यक्षमतेतही उल्लेखनीय आहेत, त्यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर आणि सोयीस्कर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी महापौर सौ संगीता खोत, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, माजी नगरसेवक संजय मेंढे, माजी नगरसेवक निरंजन आवटी, माजी नगरसेवक संदीप आवटी, आर पी आय युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म विवेक कांबळे, आर पी आय शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, भाजपाचे नेते गजेंद्र कल्लोळे, मोहन वाटवे, बाबासाहेब आळतेकर, ज्योती कांबळे, उमेश हारगे,अनघा कुलकर्णी, अनिता हारगे, गायत्री सातपुते आणि प्रियांका हारगे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *