ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत खाडे पब्लिक स्कूलचे घवघवीत यश

0
IMG-20250402-WA0010

मिरज (प्रतिनिधी)

मालगाव येथील दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था संचलित मातोश्री तानुबाई दगडु खाडे पब्लिक स्कूल मधील मुलांनी ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत १ ली ते ४थी च्या २० मुलांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये शाळेचा १००% निकाल लागला आहे. तसेच श्रीजीता राहुल माळी, मनस्वी बाळासो भिसे व आयुषी शिवानंद तवटे या विद्यार्थिनींनी कांस्य पदकांची कमाई करत शाळेच्या शिपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

अधिराज भरत पवार, सम्राज्ञी सतीश भानुसे, श्रीनिकेत दीपक बरगाले, अनघा दीपेश पाटील व साई सतीश तवटे या विद्यार्थ्यांनी चांगले गुण संपादन करत सर्वांची प्रशंसा मिळवली. या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थापक आ. डॉ. सुरेश भाऊ खाडे, अध्यक्षा स्वाती खाडे, सुमनताई खाडे, सुशांत खाडे यांचे मोलाचे सहकार्य व स्कूलच्या मुख्याध्यापिका करुणा माने, शिक्षिका मनिषा जाधव व माणिक भानुसे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *