विचारावर निष्ठा ठेवून केलेली ७८ वर्षांची वाटचाल

0
करवीर तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने कोथळी (1)

हीच आमची खरी ओळख  -माजी आमदार संपतराव पवार-पाटील

हळदी  (प्रतिनिधी)

           करवीर तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने कोथळी (ता. करवीर) येथे शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बापू आमते यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव (बापू) पवार होते.

मेळाव्यात मार्गदर्शन करताना माजी आमदार संपतराव पवार म्हणाले, “शेतकरी कामगार पक्ष सत्तेसाठी नव्हे, तर श्रमजीवी जनतेच्या हक्कांसाठी लढा देणारा पक्ष आहे. विचारावर निष्ठा ठेवून केलेली ७८ वर्षांची वाटचाल हीच आमची खरी ओळख आहे. पद नव्हे, तर प्रामाणिक काम हीच खरी प्रतिष्ठा आहे. तरुणांनी शेकापच्या विचारधारेची मशाल पुढे नेली पाहिजे.”

भोगावती साखर कारखान्याचे संचालक केरबा पाटील यांनी शेकापची अन्यायाविरोधातील भूमिका अधोरेखित करत सांगितले, “आजचे राजकारण आघाडी धर्माचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हा विचार पाळावा लागेल. कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, यासाठी आघाडीत सहभाग महत्त्वाचा आहे.”

माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर म्हणाले, “राजकीय वाटचालीत अनेक पक्ष आले आणि गेले, मात्र शेकाप आजही आपल्या विचारांवर ठाम आहे. दूध संस्था, सेवा संस्था, साखर कारखाने यामध्ये शेकापचे नेतृत्व आजही प्रभावी आहे.”

कार्यक्रमास क्रांतिसिंह पवार पाटील, अक्षय पवार पाटील, अमित कांबळे, सरदार पाटील, समर पवार पाटील, सचिन पाटील, लता कांदळकर, शरद पाटील, प्रमोद पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपसरपंच शरद पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *