गगनबावडा तालुक्यात रुग्णवाहिकेतच प्रसूती; आईला जिवदान, बाळाचा मृत्यू

0
WhatsApp Image 2025-08-19 at 5.20.58 PM

गगनबावडा (प्रतिनिधी)
गगनबावडा तालुक्यातील बोरबेट येथील कल्पना आनंदा डुकरे (वय २९) या महिलेला आज सकाळी ९:४५ वाजता प्रसूतीसाठी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर सी.पी.आर. रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, तालुक्यात मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली असून गगनबावडा–कोल्हापूर रस्ता बंद होता. त्यामुळे रुग्णवाहिका थेट रुग्णालयात पोहोचवणे अशक्य झाले. रुग्णाला गगनबावड्यातून असळजपर्यंत गाडीने आणण्यात आले, त्यानंतर पडवळवाडी ते खोकुर्ले हा प्रवास स्थानिकांच्या मदतीने चालत पार करावा लागला.

याच दरम्यान, खोकुर्ले येथे १०८ रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली. आई सुखरूप राहिली, मात्र डॉक्टरांना बाळाचा जीव वाचवता आला नाही. त्यानंतर आईची प्रकृती नाजूक असल्याने तिला पुढील उपचारासाठी सी.पी.आर. रुग्णालयात हलवण्यात आले.

या संपूर्ण बचाव मोहिमेत १०८ रुग्णवाहिका चालक सतीश कांबळे व डॉ. स्वप्नील यांनी पुराच्या पाण्यातून मार्ग काढत रुग्णाला सुखरूप रुग्णालयात पोहोचवले. त्यामुळे १०८ रुग्णवाहिका ‘जीवनदायिनी’ ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *