के. के. स्पोटर्स, पडळ. श्री. ओम दत्त चिले चषकाचा मानकरी
के. के. स्पोटर्स पडळ श्री. ओम दत्त चिले चषकाचा मानकरी
यवलूज ता.01(प्रतिनिधी) दिगवडे येथील धर्मवीर छत्रपती संभाजी राजे क्रीडांगणावर पार पडलेल्या श्री ओम दत्त चिले चषक क्रिकेट स्पर्धेत अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात पडळ संघाने फलंदाजी व गोलंदाजीच्या उत्कृष्ट कामगिरी करत क कोपार्डे र्संघावर मात करत अजिंक्यपद पटकावले तर कसबा ठाणे स्पोर्ट्स व कोतोली स्पोर्ट्स यांना उत्तेजनार्थ देण्यात आले या स्पर्धेसाठी पन्हाळ्यासह, इतर तालुक्यातून 32 संघानी सहभाग घेतला. बाद पध्दतीने खेळवलेल्या स्पर्धेत अतिम सामना पडळ व कोपार्डे याच्या दरम्यान चुरशीचा सामना झाला पडळ संघाने प्रथम फलंदाजी करताना सहा षटकात 67 धावाचे आव्हाण कोपार्डे संघासमोर ठेवले अप्रतिम गोलंदाजी व क्षेत्ररक्षण पडळ संघाचे होते गोलंदाजीचा भेदक मारा व उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत शेवटच्या षटकापर्यंत कोपार्डे संघाला झुंजवले व कोपार्डे संघाला हार मानावि लागली.
यावेळी बक्षीस वितरण संभाजी मोळे मोरारजी सातपुते बाबासो काळे बबन चौगले सागर पाटील संग्राम पाटील काकासो बनसोडे,एस .एम. पाटील व रोहित चौगले यांनी आभार मानले
0000


