चिक्कोडी जिल्ह्याची घोषणा लवकरच ः प्रा.एस.वाय.हंजी
चिक्कोडी.ता.23(वार्ताहर)
गेल्या तीन दशकापासून सुरु झालेला स्वतंत्र चिक्कोडी जिल्हा अद्याप स्थापन झाल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. यावेळी येत्या डिसेंबर अखेर महिन्यात चिक्कोडी जिल्ह्याची घोषणा होईल असा विश्वास जिल्हा संघर्ष समितीच्या आणि संघटनेच्या वतीने जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.एस.वाय.हंजी यांनी व्यक्त केले. ते येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सभाभवानात आयोजित बैठकीत बोलत होते.
हंजी पुढे म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यामधील सर्व मंत्री व आमदारांनी चिक्कोडी जिल्हा स्थापनेल आवाज उठवला आहे.सरकारकडून 31 डिसेंबरपर्यंत जिल्हा स्थापन करण्यासाठी तातडीने आग्रह करण्यासाठी मंत्री व आमदारांनी करावा. जर जिल्हा घोषित न झाल्यास उत्तर कर्नाटक राज्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी दिला.जिल्हा संघर्ष समितीचे रुद्राप्पा संगाप्पगोळ म्हणाले की, जिल्हा होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्रीसोबत चर्चा केली आहे. चिक्कोडी जिल्हा स्थापन होण्याची वेळ आता जवळ आली असून सर्वांची सहमती असल्याने लवकर जिल्हा घोषित होईल.यावेळी रवी माळी, सुरेश ब्याकुडे, रमेश करनुरे, कुमार गुडे, नागेश माळी, बसवराज साजने, अश्फाक सय्यद, राहुल वाळकी यांच्यासह, विविध संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


