निपाणी मतदारसंघात 8500 महिलांंना उज्वल गॅस योजनेचा लाभःआम.शशिकला जोल्ले

निपाणी,(प्रतिनिधी)-
देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी स्वच्छ भारत अभियान राबवून घरोघरी शौचालयाची निर्मिती करून महिलांचा सन्मान केला. त्यानंंतर 2025 पर्यंत प्रत्येक प्रत्येक घरात गॅस देऊन महिलांचा सन्मान करण्याचे अभिवचन दिले होते. ते आज देशात पूर्ण होत आले आहे. उज्वल गॅस योजनेअंतर्गत घरोघरी मोफत गॅस योजना दिली जात आहे. आपणही आमदार झाल्यानंतर 2014 पासून आजपर्यंत निपाणी मतदारसंघात 8500 महिलांंना उज्वल योजनेचे मोफत गॅस वितरण केले असल्याचे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी केले.
येथील राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनात उज्वल गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस वितरण, कामगारांना कामगार विभागाकडून आलेले विविध साहित्य व पोस्ट खात्यातर्फे विश्वकर्मा योजनेतून विविध उद्योग व्यवसायिकांंना आलेल्या साहित्याचे वितरण करताना आमदार जोल्ले बोलत होत्या.पुढे बोलताना आम.जोल्ले म्हणाल्या, निपाणी मतदारसंघाचे नेतृत्व करताना केंद्र व राज्य शासनाकडून येणारी प्रत्येक योजना मतदारसंघातील तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे प्रामाणिक काम केले आहे. असंंघटित कामगार, लहान मोठे व्यवसाय करणारे कारागीर आणि महिलांंना व्यवसाय उद्योगासाठी नेहमीच केंद्र व राज्य शासनाच्या योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळेच यावर्षी 1512 महिलांना उज्वल गॅस योजना देण्यात आली आहे. देशात 11 कोटी महिलांंनी या योजनेचा लाभ घेतला आहे.तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2019 पासून सुरू केलेली विश्वकर्मा योजना ही अत्यंंत महत्त्वाची योजना आहे. कारण या समाजाचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांना शासकीय स्तरावर मदत मिळावी यासाठी ही योजना सुरू आहे. निपाणी मतदारसंघातील 200 जणांना या योजनेचा लाभ झाला आहे. तर बांधकाम क्षेत्रातील कामगारांना अनेक शासकीय योजनाचा लाभ मिळवून दिला आहे. कोरोना काळात पाच ते सहा हजार लोकांना धान्याचे किट वितरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांना अपघात विमा पेन्शन मुलांना शिष्यवृत्ती आणि मुलांच्या लग्नासाठी 50 हजाराची मदत मिळवून देण्यात आली आहे. त्यामुळे येथून पुढेही निपाणीच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना प्रामाणिकपणे राबविणार असल्याचे सांगितले.
यावेळी कामगार विभागाचे अधिकारी संजीव भोसले, पोस्ट मास्तर दर्शन उपाध्ये यांनी कामगारांसाठी आणि विश्वकर्मा योजनेतून येणाऱ्या योजनेची सविस्तर माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष राजू गुंंदेशा, माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, संतोष सांगावकर, रवी कदम, विजय टवळे, बंडा घोरपडे, योगिता घोरपड,े जिजाबाई राऊत, प्रणव मानवी यांच्यासह कार्यकर्ते व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार संंपतराव कुरणे यांनी मांनले.


