शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर भाडेतत्वावर घेवून विकणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक
37 लाखाचे 8 ट्रॅक्टर जप्त, निपाणी पोलीसांची कारवाई

निपाणी,ता.13(प्रतिनिधी)-
निपाणी, चिकोडी, कागल, रायबाग भागातील शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर करार तत्वावर घेवून जादा भाडे देण्याचे आमिष दाखवित ट्रॅक्टर घेवून जावून परराज्यात विकणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक करण्यात निपाणी बसवेश्वर चौक पोलीसांना यश आले आहे. आंतरराज्य स्तरावरील 5 चोरट्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 8 ट्रॅक्टर पकडून 37 लाखाचे साहित्य जप्त केले आहे.
याप्रकरणी अजय संंंतोष चव्हाण (वय 23 रा. सरताळे,ता.जावळी, जिल्हा सातारा), पुष्पर पुष्पशिल सांळुखे (वय 31 रा. म्हसोबावाडी, ता.इंदापूर,जि. पुणे), सोमनाथ शंकर डमाळ (वय 36 रा.म्हसोबाचीवाडa ता.इंदापुर,जि.पुणे), दत्तात्रय संताजी गाडेकर (वय 23 रा. वाखेचोपडज, ता. बारामती, जि. पुणे ), आकाश अंकुश गाडे (वय 33 रा. मुरंब,ता. बारामती, जि. पुणे) यांना पोलीसांनी अटक करून तपास चालविला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, 11 नोंव्हेबर 2025 रोजी रमेश सिदगोंडा माळी (रा. पांगीरे ए.) व अन्य 13 जणांनी बसवेश्वर पोलीस ठाण्यात त्रकार दाखल केली.तक्रारीत त्यांनी आपण व अन्य 14 जणांनी 06-09-2024 ते 08/11/2025 दरम्यान निप्पानी न्यायालयाच्या आवारातून नोटरी बॉन्ड करीत वरिल आरोपींनी मासिक भाडे देण्याचे आश्वासन दिले होते. 15 ट्रॅक्टर घेवून गेल्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर मालकांना परत केले नव्हते. ट्रॅक्टर मालकांनी पैसे मागितले तेव्हा आता पैसे देईन,नंतर देईन असे सांगून फसवित होते.पैसे मागण्यासाठी ते त्याच्या घरी गेले तेव्हा तो पळून गेले. त्यामुळे 15 ट्रॅक्टर मालकांनी आपली फसवणूक झाली असल्याची बसवेश्वर चौक पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक: 73/2025 कलम: 318(4) बीएनएस-2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यांनुसार बेळगांव जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आर.बी. बसरगी, डीवायएसीपी गोपालकृष्ण गौडा, निपाणी सीपीआय बी.एस. तलवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रमेश पवार, स्टेशनचे कर्मचारी आर.जी.दिवटे, एम.ए. तेरदाळ, मारूती कांबळे, प्रशांत कुदरी, लक्ष्मण कुदरी व कर्मचाऱ्यांनी विशेष तपास पथक तयार करून तपास करण्यात आला.
आरोपींना अटक करून चौकशी केली असता आरोपींनी निपाणी, चिक्कोडी, रायबागा आणि कागल तालुक्यांधील ट्रॅक्टर फसवणूक करून पुणे,सातारा आणि नाशिक जिल्ह्यातील विविध भागात विकल्याचे आढळून आले.त्यानुसार तपास पथकाने महाराष्ट्रातील विविध जिल्हात 10 दिवसात शोधून अंदाजे 37,00,000/- रुपये किमतीचे एकूण 8 ट्रॅक्टर जप्त केले आहेत. आरोपींना अटक करून अन्य चोरीतील ट्रॅक्टरचा शोध पोलीसांन सुरू ठेवला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आंतराज्य टोळीला पकडण्यात पोलीसांना यश आल्याने पोलीसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


