कॉमर्स कॉलेज मध्ये Latest Trend in Entrepreneurship या विषयावर कार्यशाळा संपन्न

0
1000233416

कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ.व्ही एन मगदूम यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले.

कोल्हापूर (प्रतिनिधी) देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स ,बीबीए विभागाच्या वतीने, अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत “Latest Trend in Entrepreneurship” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली 

यावेळी प्रा.डॉ. प्रवीण जाधव, श्री निलेश कदम, आणि प्रा. डॉ. ए एम गुरव हे सर्व प्रमुख प्रवक्ते उपस्थित होते. छोट्या छोट्या उद्योगांपासून मोठमोठे व्यवसाय कसे केले जातात असे अनेक उद्योजकतेविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेसाठी शहाजी कॉलेज कोल्हापूर, नाईट कॉलेज कोल्हापूर, के. एम. सी.कॉलेज कोल्हापूर, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर या कॉलेजची विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे नियोजन विभाग प्रमुख डॉ. सीमा बेनाडे यांनी केले. या कार्यक्रमास बी.बी.ए विभागातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि उपस्थित होते. प्राचार्या डॉ. वि.वि. मैंदर्गी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ.व्ही एन मगदूम यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले. तसेच अध्यक्ष कौन्सिल ऑफ एज्युकेशन सौ रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉक्टर प्रसाद मगदूम,संचालक Adv. वैभव पेडणेकर, संचालक Adv. अमित वाडकर त्यांचेही मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन सहा. प्रा. एम एन महाडिक यांनी केले.सहा. प्रा. प्रतीक भस्मे, सहा. प्रा.सायली पाटील यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *