नाइट कॉलेजमध्ये आज राष्ट्रीय स्तरावरील कथाकथन आणि काव्यवाचन स्पर्धा

0
IMG_20260123_131015

अध्यक्षस्थान कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम भूषवीत आहेत .

कोल्हापूर (प्रतिनिधी): मराठी विभाग, नाइट कॉलेज कोल्हापूर, आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील आंतरमहाविद्यालयीन मराठी कथाकथन आणि काव्यवाचन स्पर्धा शनिवार, दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी नाइट कॉलेजमध्ये आयोजित केल्या आहेत.

     विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील ललित लेखनाची आणि भाषिक अभिव्यक्तीची कौशल्ये विकसित व्हावीत, यासाठी त्यांना संधी देणे व पारितोषिके देऊन प्रोत्साहन देणे या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. एक प्रकारे हे विद्यार्थ्यांच्या सर्जनशील प्रतिभेचे आविष्करण करणारे साहित्य संमेलनच आहे. यामध्ये विद्यार्थी स्वलिखित कवितांचे सादरीकरण आणि कथाकथन करणार आहेत महाराष्ट्राच्या विविध महाविद्यालयांमधून सुमारे 85 विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. या निमित्ताने नाइट कॉलेजमध्ये महाविद्यालयीन तरुणाईच्या प्रतिभेचा फुलोरा फुलणार आहे. 

      स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सकाळी दहा वाजता होत असून उद्घाटक म्हणून मा . वृषाली पाटील (सहायक संचालक, (माहिती ) विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर ) या उपस्थित राहत आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम भूषवीत आहेत . याप्रसंगी सौ रजनीताई मगदूम, (अध्यक्षा,कौन्सिल ऑफ एज्युकेशन ) डॉ .प्रसाद मगदूम, ॲड . वैभव पेडणेकर, ॲड अमित बाडकर हे उपस्थित राहत आहेत .

 दिवसभर कथाकथन आणि काव्यवाचन स्पर्धा होतील . प्रथम तीन क्रमांकाना शिविम व नाइट कॉलेजच्या वतीने पारितोषिके दिली जाणार आहेत.स्पर्धेनंतर लगेचच पारितोषिक वितरण संपन्न होईल. पारितोषिक वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा .भालचंद्र यादव (निवासी नायब तहसीलदार करवीर),डॉ विश्वनाथ मगदूम (सचिव, कौन्सिल ऑफ एज्युकेशन ) प्रा . डॉ . मांतेश हिरेमठ, (सचिव, शिविम), हे उपस्थित राहत आहेत. या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य प्रा . डॉ . उत्तम पाटील व स्पर्धेचे निमंत्रक व मराठी विभाग प्रमुख प्रा . डॉ . अरुण शिंदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *