निपाणीतील लाभार्थ्यांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षात घरकुल हक्कपत्र,पहिल्या टप्यात 432 जणांना वाटप होणार आम.शशिकला जोल्ले

0

4 हप्ते भरलेल्या 432 जणांना पहिल्या टप्यात वाटप
निपाणी,(प्रतिनिधी)-
आपण 2012 पासून 2026 पर्यत निपाणी मतदार सघाचा प्रामाणिकपणे विकास करीत आहे. शहरातील घरकुल योजनेला थोडा विलंब झाला असला तरी तेथील रस्ते, पाणी गटारी आणि विद्युत पुरवठा या सुविधा उपलब्ध करून 1812 पैकी 600 घरे पूर्ण सज्ज झाली असून गुढीपाडव्याच्या नवीन वर्षात 4 हप्ते भरलेल्या 432 जणांना घरकुल योजनेचे हक्कत्र वाटप केले जाईल. त्यामुळे स्वतःच्या घरात आनंंदात राहा असे सांगत सबका प्रयास सबका विश्‍वास, सबका विकास नक्कीच होणार असल्याचे प्रतिपादआमदार शशिकला जोल्ले यांनी केले.
येथील पट्टणकुडी परिसरात निपाणी नगरपालिकेच प्रधान मंत्री घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या बैठकीत आम.जोल्ले बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर बीडीसी बँकचे अध्यक्ष माजी. खास अण्णासाहेब जोल्ले, आयुक्त गणपती पाटील उपस्थित होते. पुढे बोलताना आम.जोल्ले म्हणाल्या, जग, देश पुढे विकसीत होत असताना अनेक समस्या जाणवित असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात महिलांच्या सन्मानार्थ हर घर शौचालय योजना राबविली. त्यांनतर धुरांड्याचे अश्रु अनावर झालेल्या 11 कोटी भगिनींना उज्वल मोफत गॅस पुरवठा केला. आपण निपाणी मतदार संघात 8 हजार महिलांना गॅस दिला. त्यानंतर 2027 पर्यंत एकही घरकुलाविना राहणार नाही याकरीत प्रधान मंत्री घरकुल योजना मंजूरीला दिली.

आपणही निपाणीत 2 हजार घरांची योजना आखली. याकरीता 1812 घरकुल तयार होणार आहेत. यामध्ये 600 घरे पूर्ण तयार असून 4 हप्ते भरलेल्या 432 जणांनी तात्काळ घरकुल हक्कपत्र दिले जाईल.त्यानंतर 360 तयार होत आली आहेत. हप्ते भरतील त्याप्रमाणे घरे दिली जातील. घरे वाटप करतान लॉटरी पध्दत केली जाईल. यामध्यही एका ब्लॉकमध्ये 12 कुटंबांनी आपली नांवे एकत्र देवून चिठ्या उधळून घरे स्विकारण्यास अनुमती दिली. त्याप्रमाणे वयस्कर, अपंगांना तळ मजल्यावरील घरे दिली जाणार आहेत.तसेच अद्याप घरे शिल्लक असून गरजवंत लाभार्थ्यांनी घरासाठी नगरपालिकेकडे अर्ज करावेत असे आवाहन करीत आम. जोल्ले यांनी घरकुलबरोबर येथे एसटी सेवा देण्याबरोबर येथील महिलांकरीत लघू उद्योग निर्माण करून महिलांच्या हाताला काम देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही आमदार जोल्ले यांनी सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, राजू गुंदेशा, सुनिल पाटील, जुबेर बागवान, विजय टवळे, अभिनंदन मुदकुडे, महेश सुर्यवंशी, रवि कदम यांच्यासह मान्यवर व लाभार्थी उपस्थित होते. स्वागत व आभार संपत कुरणे मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा