अण्णांच्या शैक्षणिक कार्यात लक्ष्मी वहिनींचे अमूल्य योगदान – डॉ.मनिषा पाटील

0
WhatsApp Image 2026-03-18 at 4.07.32 PM

अण्णांच्या शैक्षणिक कार्यात लक्ष्मी वहिनींचे अमूल्य योगदान – डॉ.मनिषा पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी)  अण्णांच्या शैक्षणिक कार्यात लक्ष्मी वहिनींचे योगदान अमूल्य आहे. त्यांचे संपूर्ण आयुष्य त्याग पूर्ण राहिले आहे. अण्णांच्या अनुपस्थित संस्थेचा कारभार त्यांनी नेटाने चालवला. प्रसंगी गळ्यातील सौभाग्याचा अलंकार गहाण ठेवून वसतिगृहातील मुलांना सणासुदीला गोडधोड खाऊ घातले. त्या खऱ्या अर्थाने माऊली होत्या. त्यांनी वसतिगृहातील मुलांची आईप्रमाणे काळजी घेतली. प्रसंगी माहेरून मिळालेले स्त्रीधन त्यांनी अण्णांच्या शैक्षणिक कार्यात खर्ची घातले. असे प्रतिपादन प्रो.डॉ. मनिषा पाटील यांनी केले. त्या रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कदमवाडी रोड कोल्हापूर येथे सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विशेष व्याख्यानात बोलत होत्या.

       यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रो.डॉ.डी.आर.भोसले म्हणाले की, सौ. लक्ष्मी वहिनीचे कार्य हे समाजातील गोरगरीबांच्यासाठी होते. त्यांनी अण्णांच्या शैक्षणिक कार्यात मोलाची साथ दिली. आज समाजातील स्त्रीयांनी सौ.लक्ष्मी वहिनींच्या आदर्श घेणे आवश्यक आहे. कर्मवीरांनी आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याने सर्व जातीधर्माच्या सीमा तोडल्या. त्यांच्या ह्या कार्यात त्यांना रयत माऊलींची साथ लाभली. त्यामुळे कर्मवीर आण्णा आणि रयत माऊली हे दोघेही समाजासाठी पूजनीय ठरले. असे विचार मा. प्राचार्यांनी मांडले. 

      सौ. लक्ष्मी वहिनीच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाविद्यालयाच्या सर्व स्टाफच्यावतीने महाविद्यालयातील व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना ‘खीर’ वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य मा. सरोज पाटील (माई) व महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन मा.संगीता (वहिनी) पाटील यांनी प्रेरणा दिली. यावेळी विचारपीठावर सौ.लक्ष्मी वहिनींचे नातलग श्री.नितीन देसाई, श्री.सुभाष देसाई, श्रीमती प्रेमा देसाई, श्रीमती अर्चना देसाई, श्रीमती माणिक पोवार व अर्थशास्त्र विभागाच्या माजी विभागप्रमुख प्रो. डॉ. बी. एस. पुणतांबेकर ह्या उपस्थित होत्या. ह्या कार्यक्रमास अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ.उमेश शेळके, महाविद्यालयातील विविध विषयाचे विभागप्रमुख, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागाचे सदस्य डॉ. बी. एम. मगदूम यांनी केले. आभार प्रा. सुमन कांबळे यांनी मानले तर सूत्रसंचालन श्रीमती प्रा. एम. जे. थोरात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *