शाहूवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी शिवाजी पाटील निधन

0
WhatsApp Image 2026-06-01 at 5.39.59 PM

सरूड (प्रतिनिधी) शाहूवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले  पोलीस कर्मचारी शिवाजी बापू पाटील वय वर्षे ४५, यांचे ड्युटीवरून घरी परतत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने शाहूवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

      शिवाजी पाटील हे आपले कर्तव्य बजावून घरी परतत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

   शिवाजी पाटील हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि मनमिळाऊ स्वभावाचे पोलीस कर्मचारी म्हणून ओळखले जात होते. सहकारी कर्मचारी तसेच नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने पोलीस दलाने एक कर्तव्यदक्ष सहकारी गमावला असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्यावर शासकीय इस्मानात त्यांच्या  मूळ गावी डोणोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *