हुक्केरी घराण्यास मंत्रीपद देण्यात यावे ः काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी-चिक्कोडीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा भव्य मोर्चा

0
1002537554

चिक्कोडी,ता.03(प्रतिनिधी)-
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी किंवा आमदार गणेश हुक्केरी यांना मंत्रीपद देण्यात यावे या मागणीसाठी आज काँग्रेस कार्यकर्त्यांकडून चिकोडी शहरात भव्य मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.शहरातील सरकारी विश्रामगृहापासून ते बसव सर्कलपर्यंत चिकोडी सदलगा मतदार संघातील विविध भागातून आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी भव्य मोर्चा काढला. या ठिकाणी काही वेळ मानवी साखळी करून निदर्शने केली.
त्यानंतर चिकोडी सदलगा ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सतीश कुलकर्णी व चिकोडी सदलगा व ब्लॉक काँग्रेस ग्रामीणचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्या माध्यमातून अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीला मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात मागील 40 वर्षांपासून काँग्रेस पक्षात हुक्केरी पिता पुत्र प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत. आजपर्यंत कोणत्याही आमिषाला बळी न पडता काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून मागील अनेक दशकांपासून या भागामध्ये काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकून ठेवले आहे.नव्या मंत्रिमंडळ रचनेत आमदार प्रकाश हुक्केरी किंवा आमदार गणेश हुक्केरी यांना मंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.यावेळी अनिल पाटील, रवी मिरजे, गुलाब बागवान, साबीर जमादार, परशुराम काळे, इरफान बेपारी, नरेंद्र नेरलीकर हुक्केरी घराण्यास मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी करत मंत्रीपद न दिल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
यावेळी नगरसेवक अनिल माने, रंजीत शिरसेठ, प्रभाकर कोरे, श्‍याम रेवडे, मुदसर जमादार, सचिन पोवार, अश्‍वत शितोळे, ॲड एच.एस.नसलापुरे, बाळासाहेब पाटील, रमेश पाटील, अण्णासाहेब हावले,सुनील सप्तसागरे, अंकुश खोत, रवींद्र खोत,विनोद कागे, मलिकार्जुन पाटील, संभाजी पाटील, उमेश मठपती,पप्पू किलिकत, राजू गुंडकले, सिताराम पाटील, गणेश मोहिते, उमेश सातवर, किरण माळीयांच्यासह, चिक्कोडी सदलगा मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा