मराठा समाजाचे नेते आम.संतोष लाड यांना राज्य मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद द्यावे-निपाणीतील मराठा समाजबांधवाची बैठकीत मागणीे
निपाणी,ता.02(प्रतिनिधी)-
मराठा समाजाचे काँग्रेसचे कर्तबगार आमदार संतोष लाड यांना कर्नाटक सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी राज्यातील समस्त मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत असून निपाणीतील सर्वपक्षीय मराठा समाजाच्या वतीनेही त्यांना शिवकुमार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची संधी द्यावी अशी मागणी येथील छ. शिवाजी चौक येथील मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आली.
यावेळी बोलताना बाळासाहेब सुर्यवंशी यांनी संतोष लाड साहेब यांनी मराठा समाजाच्या माध्यमातून काँग्रेसला सदैव बळकटी मिळावी म्हणून कार्य केले आहे.राज्यात 50 लाखांहून अधिक मराठा समाज असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संतोष लाड यांना कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळाले पाहिजे असे सांगितले. यांना कॅबिनेट मंत्री पद मिळावे. अशी मागणी एकमुखाने मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.त्याचा समाजाला लाभ होईल.
गोपाळ नाईक म्हणाले, शिवकुमार सरकारने मराठा समाजाला न्याय द्यावा. काँग्रेस हा सर्वांना सामावून घेणारा पक्ष आहे. मराठा समाजाला न्याय देत संतोष लाड यांना मंत्रीमंडळात स्थान देवून त्यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्री पद द्यावे.
दिपक वळीवडे, दिलीप पठाडे, विनोद साळुंखे यांनीही लाड यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे असे सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रभाकर सडोलकर-भाटले, गोपाळराव नाईक, बाळासाहेब सरकार, रवींद्र शिंदे, जयराम मिरजकर, दिलीप पठाडे, बाबासाहेब तिप्पे, ज्ञानेश्वर ढेरे, दीपक सावंत, विजय ऱ्हाटवळ, राजू कोपार्डे, उत्तम कामते, अतुल चावरेकर, सुनील हिरुगडे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती.


