महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रशासकीय अधिकारीपदी प्रवीण कुमार नाईक यांची निवड

0
IMG_20260605_183326

सरूड (प्रतिनिधी)  शाहूवाडी तालुक्यातील सरूड येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रवीणकुमार परशुराम नाईक यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रशासकीय अधिकारी पदासाठी निवड झाली आहे. त्यांची नियुक्ती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे करण्यात आली आहे.

         नाईक यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठ कार्यपद्धती, प्रशासकीय कौशल्य आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर ही यशस्वी वाटचाल साध्य केली आहे. त्यांच्या या निवडीमुळे कोल्हापूर जिल्ह्यासह कृषी विभागातील सहकारी आणि मित्रपरिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे संबंधित विभागाच्या कामकाजाला अधिक गती आणि प्रभावी नेतृत्व लाभेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *