चिक्कोडीतील रस्त्यांची दुरवस्था ः ठोस उपाययोजना करण्यात लोकप्रतिनिधींना अपयश

0
1002687736

चिक्कोडी,ता.25:(प्रतिनिधी)-
जिल्हा केंद्राचा दर्जा मिळावा अशी मागणी होत असलेल्या चिक्कोडी शहरातील प्रमुख रस्त्यांची वाईट दुरवस्था गंभीर बनली असून मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
केरूर क्रॉस ते हालट्टी या प्रमुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. शहरातील हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्यावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा होत असते. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
तेथील स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रस्ता दुरुस्तीसाठी वारंवार मागणी करूनही संबंधिताकडून ठोस उपाय योजना करण्यात आलेली नाही.केवळ आश्‍वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात काम सुरू झाले नसल्याचा स्पष्ट आरोप नागरिकांनी केला आहे.
समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तातडीने लक्ष


केरूर क्रॉस ते हालट्टी मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. वाहनचालक, शालेय विद्यार्थी आणि पादचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे.“एकीकडे चिक्कोडीला जिल्हा केंद्राचा दर्जा देण्याची मागणी जोर धरत असताना, दुसरीकडे शहरातील प्रमुख रस्त्यांची झालेली दुरवस्था विकासकामांबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण करीत आहे. या समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मंजुनाथ परगौडा (स्थानिक नागरिक).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा