कोडणीतील युवकाच्या अपघातनंतर बेजबाबदार वागणाऱ्याच्यावर कारवाईसाठी पाठपुरावा करणार आम.शशिकला जोल्ले
जोल्ले ग्रुपकडून शिंदेच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चाबरोबर 1 लाखाची मदत
निपाणी,ता.30(प्रतिनिधी)-
कोडणी येथील दैनदिन कामाकाजातून संसाराचा गाडा चालविणाऱ्या शिवाजी शिंदे या युवकाचा अपघाती मृत्यू आणि त्यांच्या पत्नी व मुलांचे गंभीर जखमी होण्याची दुर्देवी घटना आहे. दुर्देवी घटनेत सरकारी रूग्णवाहिक आणि सरकारी दवाखान्यातील कर्मचारी वर्गाचा हलगर्जीपणाबाबत आपण येत्या पावसाळी अधिवेशान आवाज उठविणार आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्या वैद्यकिय क्षेत्रातील या मंडळींच्यावर कायदेशीर कारवाईसाठी आपण पाठपुरावा करणार आहे. तर निपाणी महात्मा गांधी रूग्णालयासह ग्रामीण भागातील रूग्णालयात वैद्यकिय अधिकारी नेमणूकीसाठी मुख्यमंत्र्याचीं भेट घेणार असल्याची माहिती आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली. तसेच जोल्ले परिवार शिंदे यांच्या दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहे. तसेच यावेळी वैद्यकिय मदतीसाठी 1 लाख रूपयांचा मदत निधी देण्यात आला.
कोडणी येथील शेकडो ग्रामस्थांनी आज निपाणी शासकिय विश्रामधाम येथे आम.जोल्ले व केडीसीसी बॅकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांची भेट घेवून याबाबतचे निवेदन दिले. यावेळी आम.जोल्ले बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, 2013 पासून आपण सर्व सरकारी रूग्णालया वैद्यकिय अधिकारी, रूग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिल्या होत्या. कॉग्रेस सरकारने सरकारी रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारी कमी केले आहेत. येथील रूग्णालयात अनेक जागा रिक्त आहेत. याबाबत आपण 4 वेळी अधिवेशनात विषय मांडला आहे. पण अशा दुदेवी घटना घडत असताना आपण गप्प बसणार नसून येत्या पावसाळी अधिवेशनात हा विषय मांडणार आहे. तसेच वैद्यकिय अधिकारी भरण्याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. तसेच अपघातानंतर एक तास रूग्णवाहिका उपलब्ध न झाल्याबद्दल चिकोडी जिल्हा वैद्यकिय अधिकारी राजेंद्र खणदाळे यांना धारेवर धरले. त्यांना याबाबत जाब विचारून रात्रीच्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसल्याबद्दलही विचारणा करून याबाबत आपण कायदेशीर कारवाईबाबत आग्रह धरणार असल्याचे सांगितले. तसेच या परिवाराला वैद्यकिय उपचारासाठी 1 लाखाचा निधी देण्यात आला. तसेच त्यांच्या मुलांना शिक्षण आणि त्यांच्या पत्नीला नोकरी व मुख्यमत्री सहाय्य निधीतून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी ग्रामस्थातर्फे विनायक कानडे यांनी अपघाताचा घटनाक्रम सांगून दारूच्या लहरीत बेफर अवस्थेत चुकीच्या दिशेला जावून कारचालकाने अपघात केला आहे. यामध्ये शिंदे परिवाराच्या सर्वच सदस्यांना चिरडले आहे.तर उपचारासाठी रूग्णवाहिका, वैद्यकिय अधिकारी उपलब्ध नव्हते. तर खाजगी रूग्णालयांनी पैसे भरण्यात तगादा लावल्याने उपचार न झाल्याने शिवाजी शिंदेंचा मृत्यू झाल्याचे विदारक परिस्थीती दृश्य सर्वासमोर मांडले. त्यामुळे वैद्यकिय सेवा आणि दारू पिवून वाहाने चालविणाऱ्या विरोधात उपस्थितातून संताप आणि राग व्यक्त करण्यात येत होता.
यावेळी तहसिलदार सुरेश मुंजे, चिकोडी जिल्हा वैद्यकिय अधिकारी राजेंद्र खणदाळे, निवृत अधिकारी व्ही. व्ही. शिंदे, डॉ. कमला कुलगरे, लक्ष्मी होलगार, कमला कांबळे, डॉ. मुजावर यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष सुनिल पाटील, राजुं गुंदेशा, बंडा घोरपडे, प्रशांत केस्ते, विठ्ठल कोल्ले, सदाशिव बुदिहाळे, सुनिल खवरे, ऋूषीकेश माने यांच्यासह कोडणी ग्रामस्थ मोठ्या संख्येंने उपस्थित होते.


