निपाणीत कारच्या धडकेत कोडणीचा दुचाकीस्वार ठार ः मुलगा-पत्नी गंभीर जखमी

0
IMG-20260727-WA0096

निपाणी,ता.27(प्रतिनिधी)-


निपाणी मुरगूड रोडवर देवचंद महाविद्यालयानजीक सावंतवाडीहून मुबंईला जाताना निपाणीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात कोडणीच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर मुलगा व पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.शिवाजी प्रभाकर शिंदे वय-33 असे मृताचे नाव आहे.तर पत्नी निता शिवाजी शिंदे वय-30, मुलगा श्रवण शिवाजी शिंदे वय-9 रा.कोडणी असे जखमीची नावे आहेत.तर मुलगी राधिका शिवाजी शिंदे वय-12 ही किरकोळ जखमी झाली आहे.हा अपघात रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुबंई येथील 4 युवक पर्यटनासाठी सावंतवाडीला गेले होते.तर शिवाजी शिंदे यांचे स्वतःचे निपाणीत बेळगाव नाका परिसरात लॉन्ड्रीचे दुकान असून पत्नी दुसऱ्या लॉन्ड्रीत कामास आहे.काम संपल्यानंतर रविवारी मुलांना सुट्टी असल्यामुळे शिवाजी हे पत्नी व दोन मुलांसह निपाणी येथे नातेवार्इंकाकडे भोजन करण्यासाठी गेले होते.भोजन करून घरी परतत असताना सावंतवाडीहून निपाणीमार्गे मुबंईला जाणाऱ्या भरधाव कारने निपाणी मुरगुड रोडवरील हालसिद्धनाथ सर्विसिंग सेंटरसमोर मुरगुडहून निपाणीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने कोडणीकडे जाणाऱ्या शिवाजी यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.यामध्ये दुचाकीचा चक्काचूर होऊन शिवाजी याचा उजवा पाय मांडीपासून निकामी झाला.यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.तसेच शिवाजीचा मुलगा श्रवण याच्या उजव्या मांडीचा चेंदामेंदा झाला तर पत्नीच्या उजव्या पायाला दोन ठिकाणी फॅक्चर झाले.अपघातानंतर मद्यापान करून कार चालविल्याचा आरोप करून संताप अनावर झालेल्या 100 ते 200 युवकांनी कारमधिल दोघांची धुलाई करून कारच्या काचा फोडल्या.यामध्ये कारमधिल दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले.तर अन्य दोघांना नागरीकांनी पकडले.घटनेची माहीती मिळताच कोडणीतील युवकांनी घटनास्थळी तात्काळ घेत बचावकार्य सुरू केले.जखमींना उपचारासाठी निपाणीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले.मात्र डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलविले.मात्र मध्यरात्री उपचार सुरू असतानाच शिवाजी यांचा मृत्यू झाला.सध्या सीपीआरमध्ये शिवाजी याची पत्नी व मुलगा श्रवण यांच्यावर उपचार सुरू आहेत.आज सोमवारी सकाळी 12 वाजता शिवाजी याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस ठाण्यात झाली असून शिवाजी याचीं बहिण सुजाता राजेंद्र परीट रा.अंमलझरी यांनी फिर्याद दिली आहे.मयत शिवाजी याच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी,दोन बहिणी असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *