आदित्य ट्युटोरिअल्स अँड ऑलिम्पियाड अकॅडमीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
सांगली (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
आदित्य ट्युटोरिअल्स अँड ऑलिम्पियाड अकॅडमीतर्फे नीट, जेईई, एमएचटी-सीइटी, बोर्ड परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा “गौरव गुणवंतांचा सोहळा” भावे नाट्यमंदिर, सांगली येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकॅडमीचे संचालक डॉ. सी. ए. पवार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रेरणादायी वक्ते डॉ. कळमकर सर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
मार्गदर्शन करताना डॉ. कळमकर सर यांनी आदित्य ट्युटोरिअल्स अँड ऑलिम्पियाड अकॅडमीने अवघ्या आठ वर्षांत शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देतानाच पालकांचा विश्वास जपणारी ही नामांकित संस्था असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डॉ. सी. ए. पवार यांनी शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करत अनेक विद्यार्थ्यांचे डॉक्टर व अभियंता होण्याचे स्वप्न साकार केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. सी. ए. पवार यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त व योग्य नियोजनाच्या बळावर यश मिळते, असा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविक आर. एस. ओक सर, प्रमुख पाहुण्यांचा परिचय एस. एस. पाटील सर, तर आभार संदीप कोळी यांनी मानले.


