बालहृदयरोग तज्ञ डॉ.स्नेहल कुलकर्णी शुक्रवारी “सेवासदन” मध्ये

0
WhatsApp Image 2025-02-12 at 8.49.51 AM

मिरज (प्रतिनिधी)

सुप्रसिद्ध बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. स्नेहल एम. कुलकर्णी, डायरेक्टर – पीडियाट्रिक कार्डियोलॉजी, फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड, मुंबई या दि. १४ फेब्रुवारी रोजी मिरज येथे येणार असून मिरजेतील सुप्रसिद्ध ” सेवासदन लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल ” मध्ये रुग्णांची तपासणी करण्यासाठी सकाळी १० ते ३ ह्यावेळेत उपलब्ध असणार आहेत.

ज्या रुग्णांना, विशेषतः बालकांना व प्रौढांना जन्मजात हृदयरोग किंवा इतर बालहृदयरोगासंबंधी समस्या आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असून भारतातील एका अग्रगण्य तज्ज्ञांशी सल्लामसलत करण्याची त्यांना संधी मिळणार आहे. डॉ.स्नेहल कुलकर्णी याना या क्षेत्रातील प्रदीर्घ असा २३+ वर्षांचा अनुभव असून बालहृदयरोग क्षेत्रात त्यांचे विशेष प्राविण्य आहे. याशिवाय डायग्नोस्टिक व इंटरव्हेन्शनल कार्डियाक कॅथेटरायझेशन, स्टेंट प्रत्यारोपण, बलून डिलेटेशन, गर्भावस्थेतील हृदयरोग व्यवस्थापन , बालक व प्रौढांमधील जन्मजात हृदयरोग उपचार , फुफ्फुसीय उच्च रक्तदाब या क्षेत्रातील त्यांचा अनुभव व योगदान मोठे आहे.

शुक्रवारी डॉ.स्नेहल कुलकर्णी यांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9922030604 , सेवासदन लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज या मोबाईल नंबरवर संपर्क साधून या सुवर्णसंधीचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा व जागतिक दर्जाच्या बालहृदयरोग तज्ञांकडून तपासणी करून घ्यावी व सल्ला घ्यावा असे आवाहन सेवासदन लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज च्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *