निपाणीतील सर्वधर्मियांनी विश्व नवकार महामंत्र जाप मध्ये सहभागी व्हावे.- समस्त जैन समाजातर्फे आवाहन

निपाणी, (प्रतिनिधी) – जगातील प्रत्येकाला सुख मिळावे, सकारत्मक दृष्टीकोन वाढून एकता निमाण व्हावी यामधून जगाला शांतता निर्माण व्हावी याकरीता जगातील ११२ देशात एकाच वेळी विश्व नवकार महामंत्राचे आयोजन करण्यात आले आहे. याकरीता बुधवार दि. ९ रोजी सकाळी ७ वाजता येथील व्यंकटेश मंदिर येथे सर्वधर्मियांनी उपस्थित राहून विश्व नवकार महामंत्र जाप करावे असे आवाहन समस्त जैन समाजातर्फे करण्यात आले. येथील मास्क ग्रुप संचलित महावीर आरोग्य केंद्रात आयोजीत पत्रकार परिषदेत आवाहन करण्यात आले.
यावेळी बोलताना साहिल शाह म्हणाले, नवकार महामंत्र जाप हा एका समाजासाठी नाही तर संपूर्ण मानव जातीसाठी आहे. जगात शांतता नांदावी याकरीता या जाप करण्यात येणार असून सर्वधर्मीयींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले. अभियंते वी. बी. वेडकिहाळ म्हणाले, नवकार महामंत्र हा सर्वांच्या शांतीसाठी, सकारत्मक आणि आंतरमनाच्या शांतीसाठी सार्वजनिक जाप पठाण करावे असे आवाहन केले. माजी सभापती राजू गुंदेशा म्हणाले, सांस्कृती शांती आणि समाधान निर्माण व्हावे एकात्माने काम करावे याकरीता सर्वांनी सहभागी व्हावे. प्रकाशभाई शाह म्हणाले, विश्व शांतीकरीता प्रथमच ११२ देशामधून जाप होत आहे. सकारत्मक ताकद मिळावा हा उद्देश असल्याने सर्वांचा सहभाग महत्वाचा असल्याचे सांगितले.
नगराध्यक्षा सोनल कोठडीया बोलताना म्हणाल्या जगात शांतता स्थापन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे कार्य सुरू आहे. हिंदू संस्कृतीत ओम बिजमंत्र आहे. यामधून अनेक जापाची निर्मीती होत असताना सर्व समाजाला एकत्रीत घेवून जाण्यासाठी विश्व नवकार महामंत्राचे आयोजन होत आहे. जगाबरोबर वैयक्तीकदृष्ट्याही या जापाचा फायदा होणार असल्याने या जापात सर्वांनी सहभागी व्हावे असे सांगितले. यावेळी सचिन शाह, प्रसन्न दोशी, रूपेश शाह, सौरभ शाह, सागर मेहता, प्रणय शाह, अरूण खोडबोले आदी उपस्थित होते. स्वागत व आभार प्रतिक शाह यांनी मानले.